संकल्पपुर्तीने सामन्यांसाठी ऊभा केला असामान्य आधार
Sankalppurti built an unusual base for the matches
पालखेडसारख्या गांवात जन्मलेल्या तरूणाने गावासह तालुक्याची ओळख संकल्प पुर्ण करणारी शैक्षणिक संस्था संकल्पपुर्ती अशी केली आहे.

घरची परिस्थिती होती नाजूक !
The situation at home was delicate!
आई-वडील शेतकरी, कुटूंबातील परीस्थिती जेमतेम अगदीच दोन वेळच्या तजबीजीसाठी मोलमजुरी करायची आणि आवाक्यात खर्च अशी परीवाराची ओळख होती. आपल्या आई-वडीलांसमवेत या तरुणाने मोठ्या कष्टाने मोलमजूरी करत शिक्षण पुर्ण केले.

अशी झाले प्राथमिक शिक्षण
पालखेड गावातील जिल्हा परीषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण झाले.यानंतर गावातच “श्री पारेश्वर विद्यालयात माध्यमिक शिक्षण पुर्ण करत राजुने पायाभरणीचे संपुर्ण कौशल्ये आत्मसात केली.यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले.

शिकवणीच्या वर्गामधून ऊभी राहीली संकल्पपुर्ती
नोकरीच्या शोधात असलेल्या या तरुणाने पर्यायी व्यवसाय म्हणून लासूर स्टेशन येथे शिकवणी वर्ग सुरू केला.यानंतर याच शिरवणीवर्गाच्या माध्यमातून राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास राजूने सुरू केला. पदवीधर असलेला हा तरूण जिद्दीने पुढे जाण्यासाठी नेहमी स्वत:शी प्रामाणिक राहीला.पुढे चालून पोलिस भरती सैन्य भरती ची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी त्यांनी संकल्पपुर्तीची स्थापना केली. आणि सुरू झाला एक ध्येयवेडा प्रवास…
संकल्पपुर्तीने पुर्ण केले शेकडो कुटूंबाचे संकल्प-स्वप्न
Sankalppurti fulfilled the resolutions and dreams of hundreds of families
याच संकल्पपुर्तीच्या माध्यमातून अनेक गरजू,प्रतिकूल परीस्थितीत सरकारी नोकरीची आस बाळगणारे युवक -युवती आता वर्दीवर सलाम ठोकताय !
अगदीच कमी कालावधीत नावारुपाला आलेल्या या संकल्पपुर्तीने शेकडो आई;वडीलांच्या डोळ्यात आनंदाच्या अश्रुंचे झरे ओसंडून ,खळाळून वाहन्याचा दिव्ययोग प्राप्त करून दीलाय.अशक्य ही शक्य करण्यासाठी प्रा राजू शेळके हा तरूण जीव ओतून दिवसराञ मेहनत घेतो आहे.ते फक्त आणि फक्त गाव-खेड्यात फाटके छप्पर,बापाची तुटकी चप्पल आणि आईचा फाटका पदर ही स्थिती प्रत्येक कुटूंबाची बदलायचीच हा संकल्प प्रा शेळके या तरूणाने ऊराशी बाळगला आहे.

येथे विद्यार्थी “मस्ती” ही शिस्तीतून अनुभवतात
Here students experience “fun” through discipline.
संकल्पपुर्ती ही संस्था युवक-युवतींना सध्या पोलिस भरती,सैन्य भरतीच्या पुर्व प्रशिक्षणाची तयारी करवून घेत आहे.यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना दररोजच्या जिवनात काही महत्वपुर्ण तत्व पाळावीच लागतील अशी सक्ती येथे आहे. वेळेवर ऊठणे, शारीरीक कसरती, ग्रंथालयातील वाचन या सोबत मार्गदर्शक व्याखाने अगदी वेळेतच अंगीकृत करणे याकडे प्रा शेळके यांचे जास्त लक्ष असते.येथे विद्यार्थ्यांना जराशी मस्तीही करायची झाली तरी शिस्तीत करायची हा यशस्वी मंञ माञ कटाक्षाने पाळला जातो. विद्यार्थ्यांना नियमांची पायमल्ली न करू देता येथील सुरक्षीतता हा पालकांचा आत्मविश्वास दिवसेंदीवस अधिक दृढ होत चालला आहे.

दिडशे विद्यार्थी मिळून एकच सेलफोन
(One hundred and fifty students share one cellphone)
येथे मुलांसाठी स्वतंञ वस्तीगृह तयार करण्यात आले तर मुलींसाठी वेगळे वस्तीगृह ऊभारण्यात आले आहे.दोघे पती-पत्नी एकदिलाने या संपुर्ण विद्यार्थ्यांना आपले कुटूंब मानून दिवसभर त्यांच्या भौतिक हालचालींवर लक्ष ठेऊन असतात.जेवनासाठी दिल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थांवर कटाक्ष ठेऊन आहार दीला जातो.

अगदीच आपल्या प्रिय नातलगांची आठवण झाली तर विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रियजणांसोबत बोलण्यासाठी फक्त एकच साधा सेलफोन आहे.यावरूनच विद्यार्थी फक्त मोजकाच संवाद साधू शकतात.