नगरविकास विभाग आणि गृहविभागाच्या पुरवणी मागणीत आमदारांनी काय मागितले?
(What did the MLAs demand in the supplementary demand of the Urban Development Department and the Home Department?)
नगरपालिकेसाठी जलशुद्धीकरण,तलाव,नविन इमारत तर गृहविभागाकडून चार पोलिस ठाण्यासाठी इमारती आणि वैजापूरसाठी कर्मचारी
वैजापूर नगरपालिकेकरीता नव्याने जल शुद्धिकरण प्रकल्प करावा
(A new water purification project should be done for Vaijapur Municipality.)
वैजापूर हे शहर महत्वपुर्ण ठीकाण असून नगरपालिका आणि तालुक्याच गांव असल्याच आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी पुरवणी मागणीत म्हटले आहे. 42000 लोकसंख्येच हे शहर असून गेल्या अडीच वर्षांपासून जलशुद्धीकरण प्रकल्प- पाणी फिल्टर प्रकल्प बंद असल्याच गाऱ्हाण मांडत सरकारला विनंती करत वैजापूर नगरपालिकेकरीता नव्याने जल शुद्धिकरण प्रकल्प करावा अशी पहिली मागणी आमदार बोरनारे यांनी केली आहे.

नांदूर मधमेश्वर कालव्याच्या अंतर्गत जल साठवण तलाव
(Water storage tank under Nandur Madhameshwar Canal)
गोदावरी नदीच पाणी जिथे पोहचते त्या गोयगांवच्या जल साठवण तलावाचे कॉंक्रेटीकरण कराव असेही ते म्हटले आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याच्या अंतर्गत जल साठवण तलाव ऊभारल्यास वैजापूरकरांच्या पिण्याच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल अशी मागणी केली आहे.
नगरपालिकेच्या इमारतीत प्रत्येक विभाग वेगवेगळ्या ठीकाणी आहे त्यामुळे नागरीकांची हेळसांड होते.याकरीता नगपालिकेस प्रशासकीय इमारत सरकारच्या माध्यमातून देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी केली आहे.
पंधरावा वित्त आयोगाचा निधी खाजगी गुत्तेदाराला न देता स्वच्छता कर्मचारी नेमल्यास स्वच्छतेचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरळीत चालेल.म्हणून पालिका स्तरावर स्वच्छता कर्मचारी नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.
स्वच्छेतेकडे वेधले लक्ष
वैजापूर पोलिस ठाण्यास शहर आणि ग्रामीण मिळून एकच पोलिस ठाणे असल्याची बाब आमदार बोरनारे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून देत शहर आणि ग्रामीण दोन्ही मिळून एकच पोलिस ठाणे असल्याने 54 गावांची मोठी हेळसांड होतेे. याकरीता
वैजापूर शहरासाठी आणि ग्रामीणसाठी स्वतंञ पोलिस ठाणे करण्यात यांव असेही ते म्हणाले.वैजापूर ग्रामीणच्या 54 गावच पोलिस ठाणे वेगवेगळे करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
चारही पोलिस ठाण्यांची अवस्था बदलण्यासाठी नविन इमारती द्याव्यात
(New buildings should be provided to change the condition of all four police stations.)
मतदारसंघात चार पोलिस ठाणे चारही पोलिस ठाण्यांची अवस्था बदलण्यासाठी नविन इमारती द्याव्यात अशी मागणी केली आहे.ज्यात प्रामुख्याने शिऊर,विरगांव,शिल्लेगांव आणि वैजापूर या चार पोलिस ठाण्यांचा सहभाग आहे.तर यात मुख्यत: वैजापूर पोलिस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने मोडकळीस आलेली आहे.ही इमारत कधी खाली कोसळेल सांगता येत नाही त्यामुळे अतितात्काळ या मुद्द्यावर गृहविभागाने चारही पोलिस ठाण्यांच्या इमारती नव्याने मंजूर कराव्यात अशी मागणी आमदार प्रा बोरनारे यांनी केली आहे.

याशिवाय वैजापूर पोलिस ठाण्यात वैजापूरचा कारभार पहाण्यासाठी अतिशय कर्मचारी कमी असल्याने वैजापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी असेही बोरनारे यांनी सांगत कर्मचारी वाढविण्याची मागणी केली आहे. यांसह अन्य महत्वपुर्ण मुद्दे नगरविभाग व गृहविभागाच्या अंतर्गत असलेल्या विशेष पुरवणी मागणीत आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी मांडले आहेत.
- Bindass Bhidu महालगांव गट,नागमठाण गणात आमदार बोरनारेंच्या या शिलेदाराची चर्चासमाजकारण आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू कारण समाजाची कामे केल्याशिवाय राजकारण होत नाही आणि राजकारणाशिवाय समाजसेवा!अशातच वेगवेगळे व्यक्तीमत्व आपल्या कामाच्या हातोटीने परीचीत आहेत प्रचलित आहेत. परंतु एक असा युना नेता जो त्याच्या बिंदास आणि निर्भीड बोलीभाषामुळे चर्चेत आला आहे.महालगांव गटातील ,नागमठाण गावच युवा नेतृत्व पवन चव्हाण यांच हे ऊदाहरण! एम कॉम पर्यंत शिक्षण… Read more: Bindass Bhidu महालगांव गट,नागमठाण गणात आमदार बोरनारेंच्या या शिलेदाराची चर्चा
- Biography Bindass :ऊसतोड कामगार ते बाजार समिती संचालक अन आता पंचायत समितीकडे ! सुरेश आल्हाट यांचा जिवनप्रवास !महाराष्ट्र म्हणजे संस्कृती विकास आणि ऐतीहासीक वारस्यातून ऊभारलं जाणार धगधगत्या नेतृत्वांच कतृत्व गाजविणार सुंदर राज्य !या सुंदर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुशोभीत करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलय ते म्हणजे गावच्या गल्लिपासून ते दिल्लीपर्यंतचे विवीध नेतृत्व ! आज अशाच एका गावखेड्याकडून कतृत्वाच्या जोरावर उंच मजल मारू पहाणाऱ्या ऊसतोड कामागाराच्या पुञाबद्दल जाणूय घेऊया बिंदास भीडूच्या या भागात!शेतकरी कुटूंबातून आणि… Read more: Biography Bindass :ऊसतोड कामगार ते बाजार समिती संचालक अन आता पंचायत समितीकडे ! सुरेश आल्हाट यांचा जिवनप्रवास !
- Politics-शेतकरी कुटूंबातील,युवकांच्या गळ्यातील ताईत अन आमदारांचा लाडका ऊतरणार आखाड्यात!अनेक दिगज्जांच्या व्यक्तीमत्वाबद्दल आपण जाणून घेतल! आज बिंदास व्यक्तीमत्व या कार्यक्रमात असच एक व्यक्तीमत्वाबद्दल आपण जाणून घेणार आहोत! शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या या युवकाने संबंध तालुक्यात आपली प्रतिमा ऊज्वल करत नावलौकीक मिळवला आहे.आजोबा अंबादास पाटील शेळके यांच्याकडून नकळत नेतृत्वाचे धडे अगदीच बालवयात तो गिरवत गेला.याशिवाय युवकांमध्ये त्याची प्रचंड क्रेज वाढत गेली.शालेय जिवनापासूनच नेतृत्वगुण विकसीत झालेला पालखेडचा… Read more: Politics-शेतकरी कुटूंबातील,युवकांच्या गळ्यातील ताईत अन आमदारांचा लाडका ऊतरणार आखाड्यात!
- Maratha Reservation -मुंबईहून आंदोलन करून परतणाऱ्या मराठा बांधवाचा ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूमराठा बांधवांच्या हक्कासाठी मुंबईत सुरू असलेल्या जरांगे पाटलांच्या नेतृत्वात राज्य भरातून कोट्यवधी मराठा समाजबांधव मुंबईला आंदोलनासाठी गेला होता. या आंदोलनात बोरसर ता वैजापूर संभाजीनगरचे राजेंद्र लहानु पवार हे सुद्धा सहभागी झालेले होते.आरक्षण मिळाल आणि या आंदोलनाहून परतत असताना त्यांच्या छातीत अचानक ञास सुरू झाला. आणि जांबरगांव च्या टोलनाक्यावर असताना त्यांना ह्रद्य दौरा म्हणजेच… Read more: Maratha Reservation -मुंबईहून आंदोलन करून परतणाऱ्या मराठा बांधवाचा ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
- Cheque Bounce धनादेश अनादर प्रकरणात 10 महीने सश्रम कारावास 130000/- नुकसान भरपाईचे आदेशधनादेश अनादरण: आरोपीस 10 महिने सश्रम कारावास1,30,000/- हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेश धनादेश अनादरण: आरोपीस 10 महिने सश्रम कारावास1,30,000/- हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेशवैजापूर: येथील वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर कडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्या प्रकरणी आरोपीस 10 महिने सश्रम कारावास तसेच रूपये 1,30,000/- हजार रुपये… Read more: Cheque Bounce धनादेश अनादर प्रकरणात 10 महीने सश्रम कारावास 130000/- नुकसान भरपाईचे आदेश













