WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.00 PM
WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.01 PM
20250711_1040409208374613131454109.png
ताज्या बातम्या बिंदास राजकारण

सैनिकाचा सेवापुर्ती सोहळा; भावपुर्ती उद्गाराने जिंकली मने| Bindass News

मातृभूमी रक्षणार्थ केलेली सेवा ही माझ्या जन्म दात्याआई-वडिलांचे  सुसंस्कार होय…!

सेवा पूर्ती सोहळ्यात फौजी गोविंद खोकले याचे प्रतिपादन….!
शांताराम मगर प्रतिनीधी वैजापुर

देशाच्या सीमांवर विविध ठिकाणी कार्यरत असताना
प्रामाणिकपणे केलेली सेवा ही माझ्या कष्ठाळू जन्म दात्या आई-वडिलांच्या सुसंस्कारचा अनमोल आशीर्वाद होय.त्यांच्या आशीर्वादानेच देशसेवा करताना जीवावर बेतलेल्या अनेक प्रसंगातून मी आज जिवंत दिसत आहे.

तसेच पत्नीच्या पती निष्ठेमुळे मी तिला साथ देण्यास आज तिच्या सोबत आहे,असे भावपुर्ण उदगार  सेवापूर्ती सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात १७वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेले  रोटेगाव ता,वैजापूर चे भूमिपुत्र गोविंद बाजीराव पा,खोकले यांनी रविवार २ फेब्रुवारी रोजी आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात रोटेगाव येथे काढले.

ते आजच्या युवक युवतींना संबोधित करतांना म्हणाले की ,”आई -वडिलांची मनोभावे सेवा करा,त्यांच्या आशीर्वादनेच
जीवनातील जीवघेण्या प्रसंगातून आपण सही सलामत राहुं शकतो व आपले कल्याण होते.

गावकऱ्यांनी सेवा निवृत्त  फौजी गोविंद बाजीराव खोकले यांची उघड्या जीप मधून पत्नी  जयश्री व कन्या सानविका सह प्रवेशद्वार पासून डीजे लावून भव्य मिरवणूक काढली महिलानी आपल्या घरा-समोर
रांगोळ्या काढून त्यांचे औक्षण केले.

माजी नगराध्यक्ष डॉ, दिनेश परदेशी, आ, बोरनारे यांचे भाऊ संजय बोरनारे,संजय निकम रोटेगाव उप सरपंच धिरजसिंह राजपूत, बळीराम राजपूत,राजे संभाजी विद्यालय चे प्राचार्य सुनिल व्यवहारे व शिक्षकवृंद ,सेवा निवृत्त प्राध्यापक जवाहर कोठारी ,माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, माजी,प,स,सदस्य मयुर राजपूत, सामाजिक कार्यकर्ते अजय पा, साळुंके,संतोष सुर्यवंशी अर्जुन जाधव व आप्तेष्ट यांनी गोविंद खोकले यांचा सपत्नीक सत्कार केला. 

तसेच त्यांच्यासपत्नीक सत्कार केला.  तसेच त्यांच्या मातोश्री मीराबाई खोकले व वडील बाजीराव खोकले यांचाही सत्कार केला.पत्रकार संघ अध्यक्ष शांताराम मगर व श्री,सूर्यवंशी, यांनी गौरव पत्र देऊन खोकले यांचा सन्मान केला.

या प्रसंगी रोटेगाव व परिसरातील  तसेच तालुक्यातील महिला-पुरुष  खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते,. सूत्र संचलन धोंडीराम ठाकूर यांनी केले आभार शांताराम मगर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्पपु खोकले भगवान खोकले.सोमनाथ खोकले सचिन शिंदे. गणेश बोर्डे.सोमनाथ बोर्डे.नवनाथ मगर.यांनी प्रयत्न केले

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.