ताज्या बातम्या बिंदास किस्से बिंदास महाराष्ट्र

आमदार बंब तुमचे लाडके….आमदार सुरेश धसांचा व्हिडीओ वायरल | बंब यांच्यावर निशाणा धरत केली मागणी| Bindass News

छञपती संभाजीनगरचे दबंग आमदार प्रशांत बंब “सीएम” फडणवीसांचे लाडके आमदार असल्याची चर्चा जोर धरून आहेत.

आमदार सुरेश धसांचा व्हिडिओ व्हायरल ६९३ कोटींची गंगापूर उपसा सिंचन योजना पुन्हा चर्चेत येतोय.
प्रशांत बंब मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत. म्हणून त्यांची पाणी योजना एका झटक्यात मंजूर केली. तसा मी पण तुमचा लाडका आमदार आहे अस वक्तव्य धस यांच्या व्हिडीओतून वायरल झाल्याची चर्चा आहे.

प्रशांत बंब यांच्या प्रमाणेच माझीही जायकवाडी धरणातून शिरूर पाटोदा तालुक्यासाठी 3.57 टिमसी पाण्याची मागणी पुर्ण करा अशी मागणी आता सुरेश धस यांनी केली आहे. या गोष्टीची राज्यभर चर्चा होत आहे .

आमदार सुरेश धस यांच्या व्हीडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला, आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदार संघात मंजूर केलेली गंगापूर उपसा सिंचन योजनेची पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात चर्चा झाली. गंगापुर खुलताबाद मतदार संघात या योजनेचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला होता. दृष्काळग्रस्त गंगापूर तालुक्याची ओळख पुसणारी
योजना असणार आहे.

आमदार प्रशांत बंब यांनी ही योजना सात वर्षापूर्वीच मंजूर करून घेतली होती. त्या योजनेचे काम मतदार संघात प्रगती पथावर आहे. ६९३ कोटी रुपये या योजनेचा निधि आहे. या योजनेतून गंगापूर तालुक्यातील तीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पुढील वर्षभरात या या योजनेचे काम पूर्ण होईल.अशी चर्चा आहे.

दरम्यान मुंबई येथील भेटीत आमदार प्रशांत बंब यांचा सत्कार करतानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो चर्चेचा विषय बनला आहे.

या भेटीनंतर पुढच्या अडीच वर्षात आमदार प्रशांत बंब यांना मंत्री पद मिळणार असल्याचीही चर्चा होत आहे.
कारण आमदार प्रशांत बंब हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू आमदार आहे,शिवाय त्यांच्या अनेक टर्म लढतीत ते अपराजित सुद्धा राहीले आहेत.

म्हणून प्रशांत बंच संपूर्ण मंत्रिमंडळात परिचित आहेत. मराठवाड्याला जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळेपर्यंत त्यांचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. सत्तेतील अडीच वर्ष मुख्यमंत्री फडणवीस त्यांना मंत्रिपद देतील अशी सुद्धा चर्चा रंगत आहेत

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.