उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दशसूत्री’ कार्यक्रमाचे आयोजन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठव्या जन्मदिना निमित्ताने संपूर्ण वर्षभर श्री एकनाथ आध्यात्मिक सेवा वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी धर्मवीर अध्यात्मिक सेनेकडून ‘दशसूत्री’ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख हभप कडूबाळ महाराज गव्हादे यांनी दिली आहे.

खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या यांच्या संकल्पनेतून श्री एकनाथ आध्यात्मिक सेवा वर्ष साजरी करण्यात येणार आहे यासाठी खा. संदिपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाठ, आ. रमेश बोरणारे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अब्दुल सत्तार,
आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.

या दशसूत्री कार्यक्रमात धर्मवीर शिवसेना अध्यात्मिक सेनेच्या मुखपत्राची निर्मिती, राज्यातील साठ हजार विद्यार्थी वर्गास ई प्रणाली द्वारे मोफत अध्यात्मिक शिक्षण, संपूर्ण राज्यभरात श्री एकनाथ भजन स्पर्धेचे आयोजन, ग्रामीण व शहरी भागातील सहाशे भजन मंडळास पखवाज व विना साहित्य वाटप, शिवसेना पक्ष अध्यात्मिक क्षेत्रातून एक लक्ष नवीन सभासद नोंदणी,
सकल पंथनिहाय सहा विभागीय अध्यात्मिक अधिवेशने, श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्षभरात प्रवास व जनजागृती, सहा हजार हिंदू मंदिराचा संपर्क व मासिक किर्तन, संपूर्ण वर्षभरात नियोजित सहा भव्य राम कथा,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यावर माहितीपटाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह अध्यक्ष निलेश महाराज गाढवे, प्रभंजन महातोले, राज्य उपाध्यक्ष डॉ. पुष्कर महाराज गोसावी, उपजिल्हाप्रमुख उद्धव महाराज कदम, उपजिल्हाप्रमुख ह भ प पारस महाराज जैन, ज्ञानेश्वर महाराज लोखंडे, तालुका प्रमुख तुकाराम महाराज वाळके, दीपक महाराज पडोळे, ज्ञानेश्वर महाराज वाघ, सुरेश महाराज आढाव, सुनील महाराज बोर्डे, अरुण महाराज ठेंगडे, सुरेश महाराज जाधव, देविदास महाराज मिसाळ तालुका कार्यकारिणीच्या मदतीने परिश्रम घेणार असल्याची माहिती गाव्हादे महाराज यांनी दिली.