मजुरासह तिघांच्या नावे परस्पर ७ कोटींचे कर्ज
अजिंठा अर्बन बँक घोटाळा : झांबडांच्या अडचणी वाढल्या, पोलिस कोठडीत वाढ
घोटाळ्यात मुख्य आरोपी माजी आ. सुभाष झांबड यांच्या अडचणी वाढल्या असून, एका महिलेसह मजूर आणि दुकानदार अशा तिघांच्या नावावर त्यांनी परस्पर ७कोटी ८५ लाखांचे कर्ज उचलले.
हे कर्ज ३६ एफडी अगेन्स्ट लोन घोटाळ्यातून परतफेड केल्याचे दाखवून रक्कम रोख स्वरूपात काढून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे या तिघांना ती बँकच माहिती नाही. दरम्यान, मंगळवारी (दि.१८) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. शर्मा यांनी झांबड यांच्या पोलिस कोठडीत २० फेब्रुवारीपर्यंत वाढ
पाच मयतांच्या नावे कर्ज
३६ एफडी अगेन्स्ट लोन घोटाळ्यातील २५ जणांना पोलिसांनी शोधले. मात्र ११ खातेधारक अद्याप निप्पन्न झाले नाहीत. २५ पैकी ६ जण झांबड यांच्याकडेच कामाला होते. त्यांना अटकही केली होती.
५ जण मयत असून त्यांच्याही नावावर कर्ज दाखवून रक्कम हडपली आहे. तिघांची परस्पर नावे वापरल्याचे उघड झाले. ९ जणांची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांनी झांबड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे १२ खाते फ्रीज केले असून या खात्यांमध्ये १२ कोटी रुपये आहेत.

माती काम करणारे रमेश जाधव, जनरल स्टोअर दुकान चालविणारे रमेश टकले तसेच गृहिणी नौशिन सबा या तिघांना अजिंठा बँक माहितीही नाही. तरीही झांबड यांनी रमेश जाधव यांच्या नावावर १ कोटी २९ लाख रुपये, रमेश टकले यांच्या
नावावर २ कोटी ३० लाख आणि नौशिन सबा यांच्या नावावर ४ कोटी २६ लाख रुपयांचे कर्ज परस्पर उचलले.
एफडी अगेन्स्ट लोन घोटाळ्यात त्यांचे कर्ज परतफेड केले आणि ही रक्कम रोख स्वरूपात काढून घेतली, अशी माहिती तपासात
समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजिंठा अर्बन बँकेच्या ९७ कोटी ४१ लाखांच्या घोटाळा
दरम्यान, अजिंठा अर्बन बँकेच्या ९७ कोटी ४१ लाखांच्या घोटाळा प्रकरणात झांबड हे दीड वर्षापासून फरार होते. ते ७ फेब्रुव-ारीला पोलिसांना शरण आले.
आर्थिक गुन्हे शाखा निरीक्षक संभाजी पवार यांनी अटकेची कारवाई करून ३६ एफडीओडी कर्ज प्रकरण, बनावट बँक बॅलन्स प्रमाणपत्र, गुन्ह्यातील इतर आरोपींचा सहभाग, बँकेतील ठेवीदारांच्या एकूण ठेवी व त्या संदर्भातील अभिलेख याबाबींवर चौकशी केली.
मात्र आरोपी झांबड यांनी काही माहिती दिली तर काही मुद्द्द्यांवर उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे.