छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Person

Devotional Story ह.भ.प.श्री कडूबाळ महाराज गव्हादे यांना अध्यात्मिक सेवा गौरव पुरस्कार

सन २००२ पासून वारकरी संप्रदायाच्या संत वाययाचा प्रचार प्रसार निरपेक्ष पणे करतात. अनेक ठिकाणी व्याख्याने शिवचरित्र राम कथा भागवत कथा सकल संत चरित्र कथा माध्यमातून निर्व्यसनी तरुणांचे भविष्य निर्मितीचे कार्य… राज्यातल्या कुठल्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण न घेता स्वयंअध्ययनाद्वारे समाज जागृती केल्याने कडूबाळ महाराज यांना बिंदास फाऊंडेशन व बिंदास माध्यम समूहाचा राज्यस्तरीय अध्यात्मिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले कडूबाळ महाराज यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर बालपणापासून अध्यात्माची आवड शालेय जीवनापासून भजन परंपरेला वाहून घेतले.

लहानपणापासून पुराण श्रवण कथा कीर्तने ऐकण्याची आवड व त्यामधून अध्यात्माच्या प्रचारा प्रसाराची प्रेरणा त्यांना मिळत गेली.

सन 2002 पासून आजपर्यंत अडीच हजार कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रचारा प्रसाराचे कार्य त्यांनी केले आहे.

ग्रामीण भागातून वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करत असताना संघटन कौशल्याची दखल घेऊन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यात्मिक आघाडीच्या राज्य संचालक पदी निवड झाली आहे. गोहत्या भृण हत्येविरोधात त्यांनी अनेक मोहीमा आखल्या आहेत.
लव्ह जिहाद जनजागृती अभियानात कडूबाळ महाराज यांनी कार्य केले आहे.

यामुळे सपत्नीक ,सहपरीवार, त्यांचा गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज, महंत गुरूवर्य नारायणानंदजी सरस्वती महाराज,बालगिरीजी महाराज,महेंद्रगिरीजी महाराज, पालकमंञी संजय शिरसाठ ,खासदार संदिपानजी भुमरे,विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ भागवत कराड, कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संघर्षकन्या संजवाताई जाधव, डॉ दिनेश परदेशी, प्रभाकरराव शिंदे, डॉ जिवन राजपूत, साबेरभाईं यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदास माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक व बिंदास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील भाडाईत यांच्या संकल्पनेतून अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.