पत्नीची निघृण हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप
२०२० साली म्हैसमाळ येथे घडली होती घटना
चारित्र्यावर संशय घेत चाकू आणि कुऱ्हाडीने वार करून पत्नीची निघृण हत्या कारणाऱ्या पतीला जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी ठोठावली.

लहू भागाजी साळवे (२७, रा. साताळा, ता. फुलंब्री) असे आर ोपीचे नाव आहे. साळवेला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून आणि आई वडिलांचे छत्र हरपल्याने मृताच्या दोन्ही मुलांना विधीसेवा प्राधिकरणाने भविष्यात योग्य ती भरपाई द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
माया हिचा विवाह आरोपी लहू साळवे सोबत
प्रकरणात मृत माया लहू साळवे (२५) यांचे वडील सुभाष लहानू तुपे (५१, म्हैसमाळ, खुलताबाद) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीची मुलगी माया हिचा विवाह आरोपी लहू साळवे सोबत झाला होता.
मायाच्या चारित्र्यावर संशय
मात्र लहू हा मायाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. लहू मूळचा साताळ्याचा आहे, मात्र तो कामानिमित्त वडिलांसह नाशिक जेल रोड येथे राहत होता.
तर माया ही दोन मुलांसह माहेरी फिर्यादीच्या घरी राहत होती. घटनेच्या चार महिन्यांपूर्वी लहूही सासुरवाडीत राहण्यासाठी आला होता. तो मायाच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करायचा