कन्नडमध्ये ८ पदे; तर ७४ मदतनीसांची पदे
कन्नड पदभरतीबाबत सर्वांना आवाहन करण्यात येते की 66 सदरील भरती प्रक्रिया ही शासन निर्णयातील नमूद शैक्षणिक अहर्तेनुसार आणि शासन निर्णयातील गुणांकनानुसार होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असणार आहे.
आपण कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये.एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प अधिकारी, कन्नड
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत रिक्त मंजूर अंगणवाडयांसाठी सेविका व मदतनीस या मानधनावरील पदांसाठी पात्र असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात सोमवार १७ फेब्रुवारी २०२५ पासून ते ४ मार्च २०२५ रोजी सांयकाळी सहा वाजे पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
यात कन्नड तालुक्यातील आठ अंगणवाडी सेविका व ७४ अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया आहे.

यामध्ये एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प कन्नड-१ मध्ये २ अंगणवाडी सेविका व ४५ अंगणवाडी मदतनीस यांचा तर एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प कन्नड-२ मध्ये ६अंगणवाडी
पाच मार्च ते ११ मार्च २०२५ या दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी करून परिशिष्ट अ नुसार गुण देऊन प्राथमिक यादी तयार करणे, १२ मार्च ते १७मार्च दरम्यान परिशिष्ट व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, १८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत सांयकाळी सहा वाजेपर्यंत तीन एप्रिल रोजी अंतिम गुणानुक्रमानुसार उमेदवारांची व नियुक्ती पत्र निर्गमित करण्यात येणार आहे.
पदभरती खालीलप्रमाणे
सेविका व २९ अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश आहे. महिला व बालविकास विभागाच्या ३० जानेवारी शासन निर्णय सहपत्र परिशिष्टअ नुसार शैक्षणिक पात्रतेचे आवश्यक गुणदान करण्यात येईल आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका
अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
तसेच पदवी पदव्युत्तर, डीएड, बीएड, एमएस-सीआयटी अथवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असल्यास त्यांची अर्जासोबत गुणपत्रिका प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. गुणपत्रिका अर्जासोबत जोडली नसल्यास गुण देता येणार नाही.