माजी आ. झांबड यांची हर्सल जेलमध्ये रवानगी
अजिंठा अर्बन बँक घोटाळा: १४ दिवस राहिले पोलिस कोठडीत

अजिंठा अर्बन बँकेच्या ९७.४१ कोटींच्या घोटाळा प्रकरणात माजी आमदार सुभाष ,झांबड यांची १४ दिवसांच्या पोलिस , कोठडीनंतर न्यायालयाने गुरुवारी (दि.२०) हर्मूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली ,असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. ज्यांना अजिंठा बँकच माहिती नाही, अशांच्याही नावाने झांबड यांनी – घोटाळा केल्याचे पोलिस कोठडीत असताना केलेल्या तपासात समोर आले होते.
कुंभमेळ्यात स्नान करून ७ फेब्रुवारीला आर्थिक गुन्हे शाखेला शरण आले होते
अजिंठा अर्बन बँकेत घोटाळा उघड झाल्यानंतर ठेवीदारांचा रोष वाढत असल्याने – सुभाष झांबड हे दीड वर्षापासून फरार होते. ते पुणे, गुजरात येथे राहिले. तेथून कुंभमेळ्यात स्नान करून ७ फेब्रुवारीला आर्थिक गुन्हे शाखेला शरण आले होते. आर्थिक गुन्हे

घोटाळेबाजांची हर्सुल जेलमध्ये गर्दी
शहरात विविध संस्थांतील घोटाळेबाज,
आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणारे आरोपी आणि आदर्श पतसंस्थेच्या अंबादास मानकापेसह २५ हून अधिक आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत अटक केली आहे. ते सर्व सध्या हसूल जेलमध्ये कैद आहेत. त्यात आता माजी आ. सुभाष झांबड यांचीही भर पडली आहे.
शाखेचे सहायक निरीक्षक सय्यद मोहसीन, अंमलदार अभिजित गायकवाड यांनी झांबड यांना बंगल्यावर जाऊन अटक केली होती.