ताज्या बातम्या बिंदास महाराष्ट्र

तुमच्या मोबाइलमधील ,हे 119 गुगल प्ले स्टोअरवरील वादग्रस्त मोबाईल अॅप हटविण्याचे आदेश

चिनी अॅपसह अन्य देशांतील ११९ अॅपवर तातडीने बंदी

केंद्र सरकारचा दणका; राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कारवाई

केंद्र सरकारने चीन, हाँगकाँगमधील ११९ मोबाईल अॅपवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. याआधी २०२० मध्ये केंद्र सरकारने टिकटॉक या चिनी अॅपसह अन्य १०० अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

गुगल प्ले स्टोअरवरील वादग्रस्त मोबाईल अॅप हटविण्याचे आदेश

दरम्यान, केंद्र सरकारने आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मोबाईल अॅपवर कारवाई सुरू केली आहे. चीन आणि हाँगकाँगशिवाय अन्य देशांतील अॅपचाही बंदी घालण्यात आलेल्या अॅपमध्ये समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम घडवून आणणाऱ्या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअरवरील वादग्रस्त मोबाईल अॅप हटविण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत. कलम ६९ (ए) अंतर्गत ही कारवाई

अश्लीलता रोखण्यासाठी विधेयक

सोशल मीडियावरील अश्लीलता रोखण्यासाठी विद्यमान माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या जागी डिजिटल इंडिया विधेयक लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नव्या कायद्यात यूट्यूबर, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाला नियमन करण्याच्या तरतुदींचा समावेश असेल. डिजिटल इंडिया विधेयकावर केंद्र सरकारचे सुमारे १५ महिन्यांपासून काम सुरू आहे. परंतु, विविध क्षेत्रांसाठी विशिष्ट तरतुदी असलेला कायदा तयार करण्यात यावा, असा विचार पुढे आला. उदा. दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती प्रसारणासाठी स्वतंत्र तरतुदी असाव्यात. यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) कारभाराचीही व्यवस्था असावी, असे मत बनले.

करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचविणाऱ्या अॅपवरही गेल्या दोन वर्षांपासून कारवाई करण्यात येत आहे.

मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर विदेशातील मोबाईल अॅप विकसित करणाऱ्या कंपन्यांनी चर्चेची तयारी दर्शविली आहे. भारत सरकारच्या नियमांचे पालन करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.