छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Agro

Success story :जिरायतीला फाटा देत केली बागायती जमिन, Software Engineer च्या प्रयोगातून बहरली शेती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका प्रामुख्याने दुष्काळी आहे. जिरायती पिके हाच पर्याय यातून उत्पन्नही जेमतेम असते तालुक्यातील सिद्धापूर येथील दीपक हरिचंद्र हारदे यांचीही परिस्थिती हीच होती त्यांना शालेय जीवनापासून शेतीची आवड यामुळे शेती व पीक पद्धतीत बदल घडविन्यास सुरुवात केली.

सिंचनाला पहिले प्राधान्य दिले नांदुर मधमेश्वर कॅनाल परिसरातून जात असल्यामुळे तेथून त्यांनी शेतीसाठी पाणी उपलब्ध केले. त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत खरिपामध्ये मका, खरीप कांदा व रब्बी मध्ये गावरान कांदा लागवड केली त्यातून शेतीचे चित्र बदलत गेले काहीशी आर्थिक स्थिरता आली परिस्थितीने पाठ सोडली नाही.

हवामानातील बदल अवकाळी कालव्याच्या नियमित आवर्तनामुळे शेततळे तयार करण्याचा निर्णय घेतला यामध्ये या सर्व संघर्षमय परिस्थितीमध्ये त्यांना त्यांचे वडील हरिचंद्र व आई मीराबाई हारदे यांची मोलाची साथ लाभली.

अश्या प्रतिकूल परिस्थितीत दहावीनंतर त्यांनी मेकॅनिकल डिप्लोमा MIT रोटेगाव येथे पूर्ण केला व इंजिनिअरिंगचे शिक्षण विखे फाउंडेशन अहमदनगर येथे पूर्ण केले त्यानंतर त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर टीसीएस मध्ये software इंजिनियर या पदावर नोकरी मिळवली.

यामध्ये सुरुवातीच्या काळात वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्यांनी सकाळ व संध्याकाळचा वेळ शेतीसाठी दिला वडिलांकडून मिळालेले शेतीचे बाळकडू व स्वतः च्या अनुभवामुळे त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले याकाळात त्यांनी वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनाला भेट देत नवीन तंत्रज्ञान जाणून घेतले इंटरनेटचा योग्य वापर करून विविध योजनाची माहिती मिळवली.

टोकण यंत्राने सोयाबीन लागवड, पट्टा पद्धत तूर लागवड यामध्ये आंतरपीक सोयाबीन ,मूग केली त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने टोकन यंत्राने लागवड करून एकरी 15 किलो सोयाबीन बियान्याची बचत केली तुरीमधील आंतरपीक करून उत्पादनाचा खर्च भागवला ड्रीप , स्पिंकलर ने शेतीला सिंचन करण्यावर भर दिला.

त्यांनी वरील पिकांची कंपनीसोबत करार पद्धतीने हमीभावाने सीड प्लॉटची लागवड केली व जागेवरून विक्री करत बाजारभावातील चढउतारावर मात करत विक्रमी उत्पादन केले वातावरणातील अनियमितता, हवामानातील बदलामुळे त्यांनी आपला मोर्चा फळबागेकडे वळवला आहे .

आता सध्या त्यांच्या शेतामध्ये दोन एकर क्षेत्रावर एन एम के गोल्डन सिताफळ व दोन एकर क्षेत्रावर पिंक तैवान पेरूची लागवड केली आहे परिसरामध्ये प्रथमच 70 गुंठे क्षेत्रा मल्चिंगवर कांदा लागवड करून एकरी रोपांची संख्या तीन लाख सद्यवतीस हजार मिळवली आहे .

यामध्ये त्यांना एकरी एक लाख जास्त रोपे मिळवळी त्यातून त्यांना भरघोस कांद्याचे उत्पन्न मिळणार आहे ते या सर्व कष्ट प्रयत्नांना व तळमळीला विविध योजनांची जोड मिळाली यामध्ये मुख्यमंत्री सोलर पंप योजनेतून सोलर, अनुदानित कांदा चाळ, एमआरजीएस मधून फळबाग लागवड या सर्व कर्तुत्वामुळे तालुक्यात व परिसरात त्यांचा प्रयोगशील युवा शेतकरी म्हणून नावलौकिक आहे.

अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी ह्याकर्तुत्वाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी आढाव साहेबांनी प्रत्यक्ष शेतावर भेट दिली व कौतुकाची थाप दिली नोकरी सांभाळत उत्कृष्ट शेती व्यवस्थापन करून तालुक्यातील युवकांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

आपल्या शिक्षणाच्या व अनुभवाच्या जोरावर त्यांनी परस्परांतील शेतकऱ्यांना एकत्र करून गट शेतीने तूर सोयाबीन आणि पेरू या पिकांची लागवडीचे मार्गदर्शन करतात रासायनिक शेतीला जैविक शेती जोड देत पिकांच्या सुष्म अन्नद्रव्यांचा योग्य समतोल राखून ते भरघोस व उत्तम गुणवत्तेचे उत्पादन घेतात TCS सारख्या नामांकित कंपनीत Software Engineer पदावर भरघोस पगाराची नोकरी करत उत्कृष्ट शेती व्यवस्थापन करून तालुक्यातील युवकांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.