बिंदास फाऊंडेशन आणि बिंदास डिजीटल माध्यम समूहाच्या वतीने यावर्षीचे राजकीय,सामाजिक,शेती आणि शैक्षणिक क्षेञासह वैद्यकीय क्षेञातील विवीध बिंदास व्यक्तीमत्वांना
वेगवेगळ्या सन्मानाने,पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

बिंदासचे पहीले बिंदासरत्न नामांकन आहे
1) निर्घोष ञिभुवन
डिजीटल माध्यम पञकारीता क्षेञातील
बिंदास पञकारीता या पुरस्कारासाठी ते नामांकीत झाले आहे.

सविस्तर
2019 मध्ये वैजापूर तालुक्यातील जानेफळ या छोट्याशा गावातून या NRT न्यूज या डिजीटल मिडियाची सुरुवात करून जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहचविल्या.
सोबतच माझ्या पंचक्रोशीतील गावातील चांगल्या बातम्या संपूर्ण राज्यात पोहायला हव्या याच उद्देशाने 24 जानेवारी 2019 मध्ये याची सुरुवात करण्यात आली..
चॅनल सुरू केल्यानंतर विविध कार्यक्रम आयोजित केले गेले.. यातील प्रत्येक उपक्रमाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला..
पत्रकारिताक्षेत्र आवडू लागल्याने यातच करिअर करायचं हे ठाम केल आणि त्यामुळे आता पत्रकारितेचे अधिकृत शिक्षण करुन संभाजीनगर मधील MGM कॉलेजमध्ये journalism and Mass communication हे तीन वर्षांचे शिक्षण पुर्ण केले…
दुसरे बिंदासरत्न नामांकन आहे
दिपक हरीश्चंद्र हारदे
शेती क्षेञातील
बिंदास युवा शेतकरी या सन्मानाने सन्मानित… करण्यात येत आहे.

सविस्तर
शेतीमध्ये सोलार पंप, ड्रिप, mulching यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व पद्धतीचा अवलंब करून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग. परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून गटशेतीने विविध पिकांची लागवड, जैविक शेती याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती.वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षातील कर्तुत्वाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी मा. आढाव साहेबांची प्रत्यक्ष शेतावर भेट व कौतुकाची थाप.TCS सारख्या नामांकित कंपनीत Software Engineer पदावर भरघोस पगाराची नोकरी करत उत्कृष्ट शेती व्यवस्थापन करून युवकांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
तिसरे बिंदासरत्न नामांकन आहे….
3)डॉ कल्याणी मनाजी पा मिसाळ(खंडागळे)
वैद्यकीय आणि पारीवारीक क्षेञातील
आदर्श युवती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील, वैजापूर तालुक्यातील गोळवाडी या गांवची माजी जिल्हा परीषद सदस्य आणि पंचायत समिती सभापति सौ सिनाताई मनाजी पाटील मिसाळ यांची कन्या असलेल्या डॉ कल्याणी हीने, जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पुर्ण करत आपल्या आई-वडीलांचीच नाही तर तालुक्याची मान ऊंचावली आहे. सासर छञपती संभाजीनगर खंडागळे परीवारात त्यांना माहेर सारखे वागवतात. घरातील महत्वपुर्ण जबाबदाऱ्या पुर्ण करून त्या उत्कृष्ट दंतचिकीत्सक म्हणून काम करत आहेत. दैनंदिन पारीवारीक जबाबदाऱ्या पार पाडून माहेर आणि सासर दोन्ही परीवारात डॉ कल्याणी यांनी एक जबाबदार आदर्श युवती म्हणून लौकीक मिळवीला आहे.
चौथे बिंदासरत्न नामांकन आहे.
4)सुधीर कांताराव सुतावणे
शैक्षणिक संस्था क्षेञाचा
आदर्श बिंदास शिक्षका पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

अकरावी बारावी विज्ञानच्या हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रिय असणारी वैजापुरातील आघाडीचे कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यश अकॅडमी किंवा यश करिअर अकॅडमी. यश अकॅडमी चे शेकडो विद्याथी आज विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत. बरेचशे विद्याथी परदेशात जाऊन देखील आपले योगदान देत आहे तसेच सरकारी क्लासवन व क्लास टू च्या पोस्टच्या माध्यमातून देशाची सेवा करत आहे. अशा या विद्याथीप्रिय अकॅडमीचे संचालक आहेत
पाचवे बिंदासरत्न नामांकन आहेत
5) श्री बबन दयाराम तांबे
शेती क्षेञातील
बिंदास शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
शेडनेट शेतीतून नियोजन केले.. अकरा एकर शेतीत मिळेल इतके उत्पन्न त्यांनी
फक्त एकच एकर शेतीत घेतले.

आधुनिक शेतीला मेहनतीची जोड देत
अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी
ते मनोबल ऊंचाविणारे बिंदास व्यक्तिमत्व ठरले …
सहावे बिंदासरत्न नामांकन आहेत
6)श्री शेख एम. एन.
शैक्षणिक क्षेञातील
आदर्श बिंदास प्राचार्य या पुरस्काराने सन्मानित होत आहे.

वैजापूर तालुक्यातील दहेगांव येथे असलेली कै. दादासाहेब पा
पाटील पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपति संभाजीनगर येथे अगदी जीवतोड मेहनत घेऊन काम करतात. त्यांचे शिक्षण एम.ए.एम.एड, डी.एस.एम पर्यत झालेले आहे. साधारणतः २००८ पासून शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत. आहेत.
सातवे बिंदासरत्व नामांकन आहे
7)प्रशांत शिंदे
राजकीय/सामाजिक क्षेञातील
आदर्श बिंदास युवानेता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
सहकुटूंब सहपरीवार या सन्मानाचा स्विकार करावा.

केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजी
नियरिंग अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर कॅम्पस इंटरव्यू द्वारे रीडर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथील कंपनीमध्ये सिलेक्शन, त्यानंतर जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड जळगाव या ठिकाणी तीन वर्ष एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर म्हणून नोकरी. राजकारणाची आवड, आणि शालेय जीवनापासून वकृत्व संपन्न गुण, राजकारणात सुरुवातीला युवासेना उपशहरप्रमुख, उप तालुकाप्रमुख ही पदे तदनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाअध्यक्ष आणि आपल्या आवडत्या नेत्याशी एकनिष्ठ आहेत
आठवे बिंदासरत्न नामांकन आहेत.
8): श्री अनिल ज्ञानदेव मनाळ
क्षेञ : शेती/कांदा बीज ऊत्पादन
ऊत्कृष्ट बिंदास शेतकरी

कांदा बीज उत्पादक शेतकरी मागील सात आठ वर्षांपासून कांदा बीज उत्पादनाची शेती करतो. आतापर्यत कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. एक सारखा कांदा आणि कांदा बियाण्याची उगवण क्षमता ९०.९५%. कांद्यात डोंगळे निघत नाही. शिवाय शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, शेतीत नव-नविन प्रयोग… जलव्यवस्थापण
नववे बिंदासरत्न नामांकन आहेत
9)श्री हभप दत्तु महाराज खपके
ऊद्योजकता क्षेञातील
आदर्श बिंदास युवा ऊद्योजक

२००० साली १० वी परीक्षा दिल्यानंतर हमरापुर सारख्या छोट्याशा गावात घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे उपजीविकेसाठी दररोज कोणाच्या शेतात काम केल्याशिवाय पर्याय नव्हता अशा परिस्थितीत पुढील शिक्षण न घेता महालगाव या ठिकाणी छोटीशी चहाची टपरी चालू केली आज त्याचा उद्योगात स्यांतर करून जवळपास १० ते १५ तरुणांना हॉटेलच्या व फर्निचर च्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला.
पुरस्काराचे नाव : बिंदास युवा ऊद्योजक
दहावे बिंदासरत्न नामांकन आहेत
10)नाव : शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान लासुर स्टेशन…
क्षेञ : साहीत्य विभाग

कर्तृत्व :
शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान लासुर स्टेशन अंतर्गत २०१८ पासून लासुर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदानात काव्य संमेलनाचे आयोजन केले जाते, २६ जानेवारी २०२५ रोजी नुकतेच काव्य संमेलन पार पडले संमेलनाचे हे आठवे वर्ष होते, या आठ वर्षात महाराष्ट्रतील अनेक नामवंत कवी यांचे सादरीकरण ऐकण्याची संधी परिसरातील कला रसिकांना मिळाली. सदर प्रतिष्ठान मध्ये डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित नागरिक असून कुणीही अध्यक्ष नाही.
पुरस्काराचे नांव : बिंदासरत्न साहीत्यरत्न पुरस्कार
अकरावे बिंदासरत्न नामांकन आहे
11) बिंदास व्यक्तिमत्वा ची माहिती
नाव : श्री समीर लोंढे
क्षेञ : पञकारीता/वृत्तपत्रे

कर्तृत्व :
वैजापूर येथुन शिक्षण घेवुन ग्रामीण व शहर भागातील समस्यांचा पत्रकारीतेच्या माध्यमातुन वाचा फोडुन सर्व सामान्यांना न्याय मिळुन देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न. सन २००१ मध्ये वैजापुर तालुक्यातील अतिदुर्गम भादली गाव येथील चारा पाणी अभावी शेकडो जनावरे दगावली तसेच आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषणाने बालकांचे मृत्यु झाल्याची बातमी प्रकाशीत केली. या पाठपुरावामुळे वैजापुर तालुक्यात दोन महिने संपुर्ण मंत्रिमंडळ व सचिव अधिकारी यांनी ठाण मांडुन कुपोषीत बालकांचे प्राण वाचविण्यास योजना आखल्या.
पुरस्काराचे नांव : बिंदास वृत्त प्रतिनीधी पुरस्कार
बारावे बिंदासरत्न नामांकन
12)बिंदास व्यक्तिमत्वा ची माहिती
नाव : कविता दौलत गायकवाड
क्षेञ : सामाजिक/राजकीय

कर्तृत्व :
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत उल्लेखणिय काम, प्रत्येक प्रभागात एटीएम यंञाद्वारे शुद्ध पाणी वितरण. ग्राम पंचायत कार्यालयाची भव्य इमारत बांधली. शेतकरी बांधवांसाठी विहीर, शेततळे, गायगोठे साठी योगदान. घरकूल योजनेसाठी प्रभावी अंमलबजावणी.. पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ते, यांसह सामाजिक योगदान
पुरस्काराचे नांव : उत्कृष्ट बिंदास महिला सरपंच
तेरावे बिंदासरत्न आहे…
13)नाव : नाव : बाळासाहेब लोणे, व्यवसाय : डिजिटल मीडिया : रायरी

कर्तृत्व :
शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध विषयावर लेखन
पुरस्काराचे नाव : बिंदासरत्न डिजीटल माध्यम पुरस्कार
चौदावे बिंदासरत्न आहे
14) नाव : प्रा राजेंद्र शेळके (संकल्पपुर्ती लासूर)
14) नाव : प्रा राजेंद्र शेळके (संकल्पपुर्ती लासूर)
क्षेञ : मार्गदर्शक शिक्षक
कर्तृत्व :

ग्रामीण भागातील शेकडो युवक युवतीसाठी संकल्पपुतीच्या माध्यमातून अविरत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सैन्य, पोलिस भरतीत ठरले अव्वल मजूर, बेरोजगार, कामगार, शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त शासकीय नोकरीच नाही तर संस्कार आणि जगण्याची कलाही दिली. भविष्यात हजारो परीवारांचे संकल्प पुर्ण करण्याचा मानस…
पुरस्काराचे नांव : उत्कृष्ट बिंदास मार्गदर्शक (शैक्षणिक, करीअर)
15)नाव : श्री. दत्तुभाऊ गायकवाड
पंधरावे बिंदासरत्न आहे.
क्षेञ : सहाय्यक फौजदार (पोलिस सेवा)

कर्तृत्व :
पोलिस सेवेत देशाची व राज्याची सेवा केली. राष्ट्रपती पदकाने सन्मानीत, नोकरीच्या काळात एकही चुकीचा शेरा नाही… मोठमोठ्या गुन्ह्यांतील आरोपींना शिताफीने पकडून गुंतागुंचीचे अनेक प्रकरणे सोडवून पोलिस विभागात शाबासकीस पाञ ठरले… परीवाराचे आणि गावाचे नांव ऊज्वल केले
पुरस्काराचे नांव : आदर्श बिंदास पोलिस अधिकारी (शासकीय सेवा)
16) सोळावे बिंदासरत्न नामांकन आहे
नाव : ह.भ.प.श्री कडूबाळ महाराज गव्हादे
क्षेञ : अध्यात्मिक कीर्तनकार

कर्तृत्व :
सन २००२ पासून वारकरी संप्रदायाच्या संत वाययाचा प्रचार प्रसार निरपेक्ष पणे करतात. अनेक ठिकाणी व्याख्याने शिवचरित्र राम कथा भागवत कथा सकल संत चरित्र कथा माध्यमातून निर्व्यसनी तरुणांचे भविष्य निर्मितीचे कार्य… राज्यातल्या कुठल्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण न घेता स्वयंअध्ययनाद्वारे समाज जागृती
सतरावे बिंदासरत्न नामांकन आहे.
17)नाव : मुक्तेश्वर विश्वनाथ लाड
क्षेञ : पोलीस उपनिरीक्षक (गुन्हे शाखा नाशिक)
कर्तृत्व :

ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबामध्ये जन्म, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन सुरुवातीला पोलीस शिपाई म्हणून नोकरी मिळवली लहानपणापासून अधिकारी होण्याचं स्वप्न करण्यासाठी धावपळीच्या नोकरी मध्ये कठोर मेहनत करून, अभ्यास करून एमपीएससी परीक्षा पास करून पंचक्रोशीतील प्रथम पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान-नाशिक क्राईम ब्रँच या ठिकाणी मोटार सायकल चोरी शोध पथकाचे प्रभारी अधिकारी, पोलीस आयुक्त सो यांच्यातर्फे प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले
पुरस्काराचे नांव : ऊत्कृष्ट बिंदास अधिकारी
अठरावे बिंदासरत्न नामांकन आहे
18)राजूभाऊ राजपूत
सामाजिक क्षेञातील
बिंदास समाजसेवक पुरस्कार
वेगवेगळ्या समस्येंवर तोडगा काढत
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी
राजूभाऊ राजपूत यांनी कार्य केले.
गावातील वेगवेगळ्या विभागात महत्वपुर्ण समस्येवर निरीक्षण करत पाठपुरावा केला.
सर्व बिंदासरत्नांचा सपत्निक ,सहपरीवार होणार मान्यवरांच्या हस्ते सन्मान
या कार्यक्रमासाठी सराला बेट गोदाधामचे मठाधिपती गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज, महंत गुरूवर्य नारायणानंदजी सरस्वती महाराज,बालगिरीजी महाराज,महेंद्रगिरीजी महाराज, पालकमंञी संजय शिरसाठ ,खासदार संदिपानजी भुमरे,विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ भागवत कराड, कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संघर्षकन्या संजवाताई जाधव, डॉ दिनेश परदेशी, प्रभाकरराव शिंदे, डॉ जिवन राजपूत, साबेरभाईं यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदास माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक व बिंदास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील भाडाईत यांच्या संकल्पनेतून अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या बिंदासरत्नांना सन्मानित करण्यात येणार आहे.