
“महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवाज”
ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 सन 2024-25 आयोजित महाराष्ट्र राज्यातील 20 लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व 10 लक्ष लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण सोहळा आज केंद्रीय मंत्री मा श्री अमित शहा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन प्रणाली द्वारे संपन्न झाला.
वैजापूर पंचायत समिती सभागृह येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत ऑनलाइन प्रणाली द्वारे आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यातील 11 हजार 212 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.

8 हजार 235 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता आमदार बोरनारेंच्या हस्ते वितरित करून लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.

यावेळी प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर 15 हजार रुपये प्रथम हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली.

या कार्यक्रमास कृ.उ.बा.स सभापती रामहरी जाधव, गटविकास अधिकारी अक्षय भगत, एकनाथ जाधव, संचालक गोरख आहेर, प्रशांत त्रिभुवन, भाजप तालुकाध्यक्ष नारायण कवडे, मोहन साळुंके, आनंद निकम , रवींद्र कसबे, विस्तार अधिकारी अमय पवार, हरिभाऊ साळुंके, राहुल शेळके प्रमुख पदाधिकारी, सरपंच, पंचायत समिती कर्मचारी अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.