ताज्या बातम्या बिंदास Agro बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

Karjmafi News शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी तहसीलवर ३ मार्च रोजी मोर्चा

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी तहसीलवर ३ मार्च रोजी मोर्चा

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफीचे आश्वासन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या निवडणूक प्रचारात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफीचे आश्वासन दिले होते. त्यांच्या त्या आश्वासनाचा सकारात्मक परिणाम म्हणून महायुतीला जनतेने निवडून दिले.

अजूनही महायुतीने आपले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांना संपूर्ण कर्जमाफीचे स्मरण देण्यासाठी ३ मार्च रोजी शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

कविटखेडा येथील रहिवासी व विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन डॉ. अर्जुन साळुंके यांनी आपल्या वैद्यकीय सेवेमधून ग्रामीण भागातील येणाऱ्या शेतकरी रुग्णांना शेतीतील पिकाविषयी विचारपूस व पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान या गोष्टीवर सातत्याने चर्चा करत असतात. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीची गाजर दाखवले, परंतु आपल्या

मी वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णांची सेवा करण्याचे माझे काम असले तरीही मी ग्रामीण भागातील माझा वैद्यकीय पेशा आहे. माझी शेतीशी व शेतकऱ्यांशी नाळ जोडल्या गेली आहे. म्हणून मी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

  • डॉ. अर्जुन साळुंके,

विविध स. सोसायटी चेअरमन, कविटखेडा.

कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ

मताची पेटी भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त आभाळाएवढे आश्वासनच दिले. हा सगळा प्रकार शेतकऱ्यावरतीच अन्यायाचा डोंगर का असावा, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ असतो. तसेच कधी दैवाने दिले तर शासनाच्या चुकीच्या धोरणाने पिकांना भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी हा सातत्याने कर्जाच्या विळख्यात भरडून जातो. यासाठी वैजापूर

तालुक्यातील तहसीलदार सुनील सावंत व पोलीस निरीक्षक शामसुंदर कवठाळे यांना निवेदन असून ३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. याप्रसंगी प्रशांत पाटील सदाफळ, छावा तालुकाध्यक्ष किशोर मगर, लोणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जगदाळे, शंकर निकम, किरण निकम यांची उपस्थिती होती.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.