बबन तांबे यांना बिंदास फाऊंडेशन चा बिंदास शेतकरी पुरस्कार
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिर्डी गांवचे भुमीपुञ असलेले बबन तांबे यांनी शेतीत राबविलेल्या नाविण्यपुर्ण प्रयोगांमुळे त्यांच्या कार्याची दखल बिंदास डिजीटल माध्यम समूहाने घेतली आहे.
बिंदास माध्यम समूहाकडून होणार सन्मानित
बबन तांबे यांना बिंदास माध्यम समूहाकडून ता 26 फेब्रुवारी रोजी
बिंदास शेतकरी या पुरस्काराने सपत्नीक ,सहपरीवार, गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज, महंत गुरूवर्य नारायणानंदजी सरस्वती महाराज,बालगिरीजी महाराज,महेंद्रगिरीजी महाराज, पालकमंञी संजय शिरसाठ ,खासदार संदिपानजी भुमरे,विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ भागवत कराड, कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संघर्षकन्या संजवाताई जाधव, डॉ दिनेश परदेशी, प्रभाकरराव शिंदे, डॉ जिवन राजपूत, साबेरभाईं यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदास माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक व बिंदास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील भाडाईत यांच्या संकल्पनेतून अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
ऊस शेती बंद झाली अन
बबन दयाराम तांबे 1990 ला दहावीनंतर शाळा सोडली वडिलोपार्जित शेतीचा छंद असल्यामुळे उसाची शेती केली. त्यावेळेस नामांकीत असलेला विनायक सहकारी साखर कारखाना सुरू असताना अगदी सर्व काही सुजलाम सफलम होतं .

परंतु साखर कारखाना बंद झाला आणि उसाची शेती संपुष्टात आली, अनेक दुष्काळाच्या झळा बसल्या नंतर कापसाची शेती त्यांनी केली.
कापसाची शेती दोन पाच वर्ष चांगली झाली ,परंतु वाढत्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नाची मिळकत कमी झाली.

नंतर 2014 साली आपला नशीबाला जोड मिळाली ती म्हणजे,मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा आणली.

अवलंबला आधुनिक शेतीचा मार्ग
तांबे यांनी आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबिला शेडनेट केले शेडनेट केल्यानंतर त्यांना असे वाटत होते की खर्च भरपूर आहे अनुभव घेत घेत उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवला आणि आज अकरा एकर शेतीचे उत्पन्न एका बाजूला आणि हे एक एकर शेती चे उत्पन्न एका बाजूला आहे.
आधुनिक शेती शेतकऱ्यासाठी पूरक आहे .मराठवाड्यासाठी अत्याधुनिक शेती एक वरदान आहे सुशिक्षित तरुणांनी शेतीकडे वळत असताना या शेतीकडे भर द्यावा असे तांबे सांगतात.