मुंबई/गोरेगांव
लग्नाच्या आमिषाने विधवा महिलांना फसवणाऱ्या भामट्याला अटक
लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलांची फसवणुक केल्याप्रकरणी प्रमोद गंगाधर नाईक नावाच्या एका भामट्याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली.
त्याने अलीकडेच एका विधवा महिलेशी लग्न करुन तिच्या घरातून सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते.
तक्रारदार महिला गोरेगाव येथे राहत असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. तिची एक मुलगी असून गेल्या वर्षी तिने तिच्या मुलीचे लग्न लावून दिले होते.

लग्नानंतर ती एकटी झाल्याने तिच्या मुलीने तिला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला होता.
तिने तिची माहिती एका संकेतस्थळावर अपलोड केली होती. तिथेच तिची ओळख प्रमोद नाईकशी झाली होती. तिच्याशी मैत्री करुन त्याने तिचा
प्रमोद हा गिरगाव येथे राहत असून तो विवाहीत आहे. लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर त्याने स्वतःची माहिती अपलोड केली होती.
त्यानंतर तो ४५ ते ५० वयोगटातील विधवा महिलांशी मैत्री करुन त्यांना लग्राचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक करत होता.
त्याच्या संपर्कात इतर तीन ते चार महिला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या महिलांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.
विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पत्नीसह मुलांचे कोरोना काळात निधन झाले असून तो सध्या एकटाच राहत असल्याचे सांगितले.
त्याच्यावर विश्वास तिने त्याच्याशी लग्न केले होते. मात्र
लग्नाच्या काही दिवसानंतर प्रमोद हा तिचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला होता.
फसवणूक झाल्याचा हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने प्रमोदविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना प्रमोदला पुण्यातून पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार महिलेचे दागिने विक्रीसाठी तो पुणे येथे आला होता. मात्र दागिन्यांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडून सोळा लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.