सरकारी नोकरीत शेकडो परीवारांचे संकल्प पुर्ण , हजारो परीवारांचा संकल्प पुर्ण करण्याचा मानस बाळगणार्या प्रा.राजेंद्र शेळके यांना उत्कृष्ट बिंदास मार्गदर्शक पुरस्कार जाहीर
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना सैन्यभरती,पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण देऊन शेकडो परीवारात पर्मंनंट आनंद पेरणाऱ्या संकल्पपुर्ती संस्थेच्या प्रा राजू शेळके यांना बिंदास फाऊंडेशन व बिंदास माध्यम समूहाचा उत्कृष्ट बिंदास मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागाशी आणि परीस्थितीशी नाळ जोडून असणाऱ्या प्रा शेळके यांच कार्य उल्लेखणिय आहे.
पोलिस भरती, सैन्य भरती प्रशिक्षण घेणाऱ्या शेकडो युवक युवतींना प्रा शेळके यांनी प्रतिकूल परीस्थितीत मदत केली आहे.

याशिवाय शेकडो गोर-गरीब कुटूंबातील साक्षर ,निरक्षर असलेल्या परीवारातील युवक-युवती पोलिस भरतीत,सैन्य भरतीत यशस्वी झाल्याने जिल्ह्यात प्रा शेळके यांचा उमदा नामलौकीक आहे.
उत्कृष्ट बिंदास मार्गदर्शक पुरस्काराने नामांकीत
त्यांच्या या कार्याची दखल घेत बिंदास फाऊंडेशन व बिंदास माध्यम समूहाने उत्कृष्ट बिंदास मार्गदर्शक पुरस्काराने त्यांना नामांकीत केले आहे.

सपत्नीक ,सहपरीवार हा पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांना निमंञीत करण्यात आले आहे. गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज, महंत गुरूवर्य नारायणानंदजी सरस्वती महाराज,बालगिरीजी महाराज,महेंद्रगिरीजी महाराज, पालकमंञी संजय शिरसाठ ,खासदार संदिपानजी भुमरे,विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ भागवत कराड, कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संघर्षकन्या संजनाताई जाधव, डॉ दिनेश परदेशी, प्रभाकरराव शिंदे, डॉ जिवन राजपूत, साबेरभाईं यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदास माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक व बिंदास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील भाडाईत यांच्या संकल्पनेतून अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा शेळके यांना सन्मानित करण्यात येणार आहे.