विद्यार्थ्यांसाठी शुन्यातून विश्व निर्मीती करणारे प्रा सुधीर सुतावणे बिंदास आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नामांकीत
अकरावी बारावी विज्ञानच्या हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रिय असणारी वैजापुरातील आघाडीचे कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यश करिअर अकॅडमी च्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शीत केले.
शेकडो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर
यश अकॅडमी चे शेकडो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत. बरेचशे विद्यार्थी परदेशात जाऊन देखील आपले योगदान देत आहे तसेच सरकारी क्लासवन व क्लास टू च्या पोस्टच्या माध्यमातून देशाची सेवा करत आहे.
अशा या विद्यार्थीप्रिय अकॅडमीचे संचालक आहेत सुधीर कांतराव सुतवणे
सुतवणे यांचे पहिली ते दहावी हे शिक्षण झेडपी हायस्कूल मुलांचे वैजापूर या शाळेतून झाले.
तसेच अकरावी व बारावी विज्ञान चे शिक्षण विनायकराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी बी इ मेकॅनिकल हा इंजिनिअरिंग मध्ये असणारा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.
विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड असल्यामुळे नोकरीच्या मागे न लागता सुतवणे सरांनी श्री रंजीत चव्हाण व श्री इनामदार सर यांच्या मदतीने 15 ऑगस्ट 2000 यावर्षी वैजापूरतच अकरावी व बारावी विज्ञान चे वैजापूरातील सर्वप्रथम कोचिंग इन्स्टिट्यूट स्थापन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण व उच्च दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण व उच्च दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर भेटले पाहिजे या विचारातूनच सुरू झालेल्या या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये सुरुवातीला केवळ पाच विद्यार्थी आलेत.
पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही कोचिंग इन्स्टिट्यूट आज वैजापूर तालुक्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था बनलेली आहे.
ज्याच्या माध्यमातून हजारो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे करिअर घडविले जात आहे.

वैजापुरात मिळालेल्या यशानंतर सुतवणे सरांनी कोपरगाव व येवला येथे देखील कोचिंग इन्स्टिट्यूट ची स्थापना यशस्वीरित्या केलेली आहे.
यासाठी त्यांना बिंदास फाऊंडेशन महाराष्ट्र व बिंदास माध्यम समूहाकडून बिंदास आदर्श शिक्षक या पुरस्कारासाठी नामांकीत करण्यात आले आहे.
त्यांना हा सन्मान स्विकारण्यासाठी सपत्नीक ,सहपरीवार निमंञीत करण्यात आले आहे.

गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज, महंत गुरूवर्य नारायणानंदजी सरस्वती महाराज,बालगिरीजी महाराज,महेंद्रगिरीजी महाराज, पालकमंञी संजय शिरसाठ ,खासदार संदिपानजी भुमरे,विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ भागवत कराड, कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संघर्षकन्या संजवाताई जाधव, डॉ दिनेश परदेशी, प्रभाकरराव शिंदे, डॉ जिवन राजपूत, साबेरभाईं यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदास माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक व बिंदास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील भाडाईत यांच्या संकल्पनेतून अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सुतवणे यांनी सुतवणे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शिक्षण संस्थेची देखील स्थापना केलेली आहे.
हे सर्व करत असताना श्री कपिल पाटील सर श्री रमेश बुबणे सर, श्री प्रकाश कुलकर्णी सर, श्री सदावर्ते सर, श्री रोहन कुलकर्णी सर, श्री गौरव दुबे सर, पप्पू निकम यांची देखील मोलाची मदत सरांना झालेली आहे.
आतापर्यंत विद्यार्थी व पालकांनी केलेल्या सहकार्यामुळे उत्तरोत्तर या शिक्षण संस्थेची प्रगती होत आहे त्याकरता सुतवणे सर विद्यार्थी व पालकांचे नेहमीच ऋणी आहेत.