बाबरा येथे खोदकामात मिळाले गुप्तधन श्री बालाजी मंदिर भक्तनिवास बांधकामात सापडल्या साडेपाच किलो चांदीच्या वस्तू
छञपती संभाजीनगर/बाबरा:
येथील प्राचीन श्री क्षेत्र बालाजी संस्थान मंदिर परिसरातील जमिनीवर भक्तनिवास बांधण्यात येणार आहे. बांधकामासाठी खड्डे करण्याचे काम सध्या सुरू आहे.
रविवारी खोदकामात जमिनीच्या खाली ३ फुटांवर चांदीच्या वस्तू सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुल यांनी गुप्तधन पंचासमक्ष ताब्यात घेत शासन दरबारी जमा केले.

मंदिराला लागून ओसाड जागेत सापडले गुप्तधन
श्री क्षेत्र बालाजी संस्थान मंदिराला लागून ओसाड जागा अनेक दिवसांपासून पडित होती. बाबूलाल रामचंद्र महाले यांच्या मालकीची ही जागा होती.
त्यांचे नातू निखील महाले व कुटुंबातील इतर सदस्यांनी तेराशे स्केवअर फूट जागेपैकी काही जागा बारा वर्षांपूर्वी मंदिरासाठी दान केली आहे.
त्या दान केलेल्या जमिनीत भक्तनिवास उभारण्यात येणार आहे. रविवारी चार वाजेच्या दरम्यान जेसीबीने खोदकाम करत असताना जमिनीच्या खाली तीन फुटांवर चांदीच्या वस्तू
याच ठिकाणी खोदकामात गुप्तधन सापडले.
चमकल्या. गुप्तधन सापडल्याची चर्चा सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ मिळाली होती. विश्वस्त मंडळाने याची माहिती वडोदबाजार पोलिस ठाणे व फुलंब्रीच्या तहसीलदारांना दिली.
तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुल यांनी या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले.
या वस्तुंचा समावेश
खोदकाम करत असताना जे गुप्तधन सापडले त्यात चांदीचे
कडुळे, बव्हाटी, दंडकडे, साखळी आदींचा समावेश आहे. या चांदीच्या वस्तू प्राचीन असल्याची चर्चा नंतर दिवसभर होत होती.
बाबूलाल रामचंद्र महाले यांच्या मालकीची ही जागा होती. त्यांचे नातू निखील महाले यांनी मंदिराला जागा दान केली आहे. यामुळे या वस्तू किमान शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.