प्राचार्य शेख यांना बिंदास फाऊंडेशन व बिंदास माध्यम समूहाचा ऊत्कृष्ट बिंदास प्राचार्य पुरस्कार
वैजापूर तालुक्यातील दहेगांव येथे असलेली कै.दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दहेगाव ता. वैजापूर जि.छत्रपति संभाजीनगर येथे अगदी जीवतोड मेहनत घेऊन काम करत असलेले प्राचार्य शेख एम एन यांना त्यांच्या कामाबद्दल बिंदास फाऊंडेशन व बिंदास माध्यम समूहाकडून उत्कृष्ट बिंदास प्राचार्य पुरस्कारासाठी नामांकीत करण्यात आले आहे.

2008 पासून शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत
त्यांचे शिक्षण एम.ए.एम.एड, डी.एस.एम पर्यंत झालेले आहे. साधारणत:
2008 पासून शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत. आहेत.

त्यांचे ध्येय आहे की ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते अथक परिश्रम घेत आहे.
सर्व गुणसंपन्न, कुशल प्रशासक, मनमिळाऊ स्वभाव,संघटन कौशल्य अशी त्यांच्या स्वभावातील महत्वाचे गुण.

त्यांना बुधवार ता 26 फेब्रुवारी रोजी सपत्नीक ,सहपरीवार,पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज, महंत गुरूवर्य नारायणानंदजी सरस्वती महाराज,बालगिरीजी महाराज,महेंद्रगिरीजी महाराज, पालकमंञी संजय शिरसाठ ,खासदार संदिपानजी भुमरे,विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ भागवत कराड, कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संघर्षकन्या संजवाताई जाधव, डॉ दिनेश परदेशी, प्रभाकरराव शिंदे, डॉ जिवन राजपूत, साबेरभाईं यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदास माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक व बिंदास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील भाडाईत यांच्या संकल्पनेतून अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.