डॉ कल्याणी मनाजी पा.मिसाळ(खंडागळे) बिंदास आदर्श युवती पुरस्काराने नामांकीत
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील ,वैजापूर तालुक्यातील गोळवाडी या गांवची माजी जिल्हा परीषद सदस्य आणि पंचायत समिती सभापति सौ सिनाताई मनाजी पाटील मिसाळ यांची कन्या असलेल्या डॉ कल्याणी हीने,जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पुर्ण करत आपल्या आई-वडीलांचीच नाही तर तालुक्याची मान ऊंचावली आहे.सासर छञपती संभाजीनगर खंडागळे परीवारात त्यांना माहेर सारखे वागवतात.
घरातील महत्वपुर्ण जबाबदाऱ्या पुर्ण करून त्या उत्कृष्ट दंतचिकीत्सक म्हणून काम करत आहेत.

दैनंदिन पारीवारीक जबाबदाऱ्या पार पाडून माहेर-आणि सासर दोन्ही परीवारात डॉ कल्याणी यांनी एक जबाबदार आदर्श युवती म्हणून लौकीक मिळवीला आहे.
जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाने त्यांनी आपल्या कतृत्वावर स्वता:ला सिद्ध केले आहे.
ग्रामीण भागातील आरोग्यासंदर्भात म्हणजेच दंतचिकीत्सेसाठी त्यांनी जिल्हातील शेकडो गावात मोफत दंत दपासणी शिबीरांच स्वखर्चाने आयोजन केले आहे.

ग्रामीण भागातील नागरीकांसाठी विशेष सवलत त्या नेहमी देत असतात वडील मनाजी पाटील मिसाळ हे राजकीय वलयात सक्रीय असल्याने समाजसेवेचे बीज बालपणीच डॉ कल्याणी यांच्या संस्कारात रूजले गेले.
आज या बिंदास कतृत्व सिद्ध करणाऱ्या तालुक्याच्या लाडक्या लेकीला आणि छञपती संभाजीनगरच्या लाडक्या सुनबाईला बिंदास फाऊंडेशन व बिंदास माध्यम समूहाकडून बिंदास आदर्श युवती या सन्मानाने नामांकीत करण्यात आले आहे.

सहकुटूंब,सहपरीवारासह त्यांना या सन्मानाने गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज, महंत गुरूवर्य नारायणानंदजी सरस्वती महाराज,बालगिरीजी महाराज,महेंद्रगिरीजी महाराज, पालकमंञी संजय शिरसाठ ,खासदार संदिपानजी भुमरे,विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ भागवत कराड, कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संघर्षकन्या संजवाताई जाधव, डॉ दिनेश परदेशी, प्रभाकरराव शिंदे, डॉ जिवन राजपूत, साबेरभाईं यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदास माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक व बिंदास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील भाडाईत यांच्या संकल्पनेतून अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.