ताज्या बातम्या बिंदास Crime

ती अल्पवयीन अन लावले लग्न, पती, सासू, सासरे, आई-वडील, भटजी, मंडपवाला अन वऱ्हाडींसह 158 जणांवर बितली

अल्पवयीन मुलीशी लग्न लावणे भोवले; तब्बल १५८ जणांवर पोलिसांत गुन्हा

पती, सासू, सासरे, आई-वडील, भडजी, मंडपवाला, वऱ्हाडींचा समावेश

तालुक्यातील भेंडाळा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या भटजी, नवरदेव, वऱ्हाडींसह १५८ लोकांवर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी तथा बाल विवाह अधिकारी ग्रामीण राहुल समाधान चराटे यांनी १६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भेंडाळा येथील आतिष एकनाथ आरडे यांच्या राहत्या घरासमोर अल्पवयीन मुलगी नाव बदललेले अनामीका (१५ वर्षे ११ महिने) हिचे सनी निवृत्ती भालेकर (२३, रा. बालानगर, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर) याच्यासोबत बाल विवाह लावला

मुलगी अल्पवयीन असल्याचे जाणीव असतानाही दोन्हीकडील मंडळीने याकडे दुर्लक्ष केल्याने नवरा मुलगा सनी निवृत्ती भालेकर, त्याची आई मंगल निवृत्ती भालेकर, वडील निवृत्ती सुभाष भालेकर तसेच मुलीचे मामा नामे आतिष एकनाथ आरडे, मामी सारिका आतिष आरडे, किरण एकनाथ आरडे, लग्न लावण

ारे भडजी प्रमोद कुलकर्णी, मंडपवाला प्रमोद मोहिते, स्वंयपाकी (सर्व रा. भेडाळा, ता. गंगापूर) व सदर लग्नास उपस्थित इतर १५० लोकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि झांजुर्ने यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ विठ्ठल जाधव करत आहेत.

बालविवाह रोखण्याचा प्रयत्न अयशस्वी

मुलीच्या मामाच्या घरी भेंडाळा येथे विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र अचूक ठिकाण माहीत नसल्याने लग्न थांबवणे शक्य झाले नाही. विवाह पार पडल्यानंतर नागरिकांनी जयश्री ठुबे यांना फोटो पाठवले.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर तीन महिन्यांच्या संघर्षानंतर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.

या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दीपक बजारे यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाइनने पुढाकार घेतला.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.