छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Crime

धक्कादायक: हजार रुपयांसाठी विवाहीतेची बदनामी.. स्क्रीनशॉटही पाठविले

फेक अकाउंट बनवून महिलेची बदनामी

इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट

बनवून एक हजार रुपयांची मागणी करत अश्लील मेसेज पाठवून एका विवाहित महिलेची बदनामी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात शिऊर पोलिस ठाण्यात १३ फेब्रुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर महिला शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी

सदर महिला शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. एका

अनोळखी व्यक्तीने ७ फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर महिलेच्या नावाने फेक अकाउंट बनवून त्यावर महिलेचे छायाचित्र वापरले.

हजार रुपये तू मला ऑनलाइन पाठव, नसता तुझी गावात बदनामी करेल

तसेच एक हजार रुपये तू मला ऑनलाइन पाठव, नसता तुझी गावात बदनामी करेल, अशी धमकी त्याने महिलेला दिली.

त्यानंतर महिलेने माझ्याकडे येऊन रोख स्वरूपात एक हजार रुपये घेऊन जा, असे मेसेजमध्ये उल्लेख केला.

हजार रुपये रोख पाठव, नसता तुझी बदनामी करेल, अशी धमकी आरोपीने दिली होती,

अश्लील मेसेज तयार करून गावातील अनेक व्हॉटसअप ग्रुपवर

त्यानंतर मात्र सदर व्यक्तीने महिलेचे काहीएक न ऐकता अश्लील मेसेज तयार करून गावातील अनेक व्हॉटसअप ग्रुपवर टाकून महिलेची बदनामी केली.

स्क्रीनशॉट महिलेला पाठविले

आणि त्याचे स्क्रीनशॉट महिलेला पाठविले. याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरून अनोळखी ०१ व्यक्तीविरोधात शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.