छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Person

शेतकरी कुटुंबातील मुलगा ते आदर्श दुध शितकरण केंद्राचा संचालक चेअरमन! भुमीपुञाचा गौरव

संदीप बारसे यांना “हृदयस्पर्शी जिवन गौरव” पुरस्कार..

वैजापूर पुढारी वृत्तसेवा:हृदयस्पर्शी सेवाभावी संस्था ,छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र  यांच्या तर्फे मानाचा असा समजला जाणारा राज्यस्तरीय हृदयस्पर्शी जीवनगौरव पुरस्कार या वर्षी वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथिल प्रसिद्ध उद्योजक संदीप अरुण बारसे यांना दिला गेला आहे.

मागिल काही वर्षांत संदीप यांनी आपल्याला व्यवसायातून असंख्य सामजिक केलेल्या कार्याची दखल घेत

हृदयस्पर्शी सेवाभावी संस्थेच्या निवड समितीने संदीप यांची निवड करत हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलगा ते एका आदर्श दुध शितकरण केंद्राचे संचालक चेअरमन असा खडतर प्रवास करत आदर्श व्यावसायीक म्हणून नावारूपाला येत असतानाच संदीप यांनी पर्यावरण,अध्यात्मिक, सामाजिक,  या सर्वच क्षेत्रात आपले योगदान देऊन एक आदर्श व्यक्ती हि उपाधी कमावली.

दुग्धव्यवसायाला चालना

त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करत. स्वच्छता, पारदर्शकता, गुणवत्ता या त्रिसूत्रीनुसार कार्य करत दुग्धव्यवसायाला चालना दिल्याने यातून ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारत परीणामी शेती सोबतच शेतकरी समृद्ध केल्याने कर्तृत्वाचा आणि शेतकरी हितासाठी केलेल्या कार्याचा आदर करीत बारसे यांना राज्यस्तरीय हृदयस्पर्शी जीवनगौरव पुरस्कार करताना हृदयस्पर्शी पुरस्कार देत असल्याचे आयोजकांनी सांगितले .

कार्यक्रम शेवगाव शहरात उचल फाउंडेशन या सामाजिक संस्थेत मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पुर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष  श्री. राहुल विलासराव संत , उचल फाउंडेशनचे संचालक सचिन खेडकर ,हृदयस्पर्शी सेवाभावी संस्थेचे संस्थापक राहुल अशोक संत, व्याख्याते अमर हजारे , डॉ. संजय लड्डा, संस्थेचे सर्व स्वयंसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार संदीप यांना देण्यात आला. पुरस्कार मिळताच संदीप यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन  केले.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.