अविस्मरणिय ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

मुल रील्स पहाताय! केमिकल लोचा बाल मेंदू विकारतज्ज्ञांचा सल्ला, स्वमग्नतासह अपस्माराचा धोका

मुलांना रील्सपासून दूर ठेवा अन्यथा केमिकल लोचा बाल मेंदू विकारतज्ज्ञांचा सल्ला, स्वमग्नतासह अपस्माराचा धोका

लहान मुलांना मोबाईलवरील रौल्सपासून दूर ठेवावे. रोल्सच्या माध्यमातून काही सेकंदात मेंदूवर वेगाने अनेक गोष्टी येऊन आदळतात. त्यामुळे केमिकल लोचा होऊन स्वमन्नता आणि अपस्माराचा धोका वाढतो, असे बाल मेंदू विकारतज्ञ डॉ. वर्ष वैद्य यांनी सांगितले

स्वमग्न व गतिमंद मुलांची शाळा येथे नुकतेच ऑटिझम

जागतिक अपस्मार दिनाच्या निमित्ताने स्वमग्न व गतिमंद मुलांची शाळा येथे नुकतेच ऑटिझम आणि अपस्मारसंदर्भात पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संचालिका अंबिका टाकळकर, पालक प्रतिनिधी मानसी राळेगावकर आणि डॉ, वर्ष वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वर्ष वैद्य यांनी अपस्मार, त्याची करणे आणि उपाय समजावताना स्वमन्न मुलांमधील अपस्मार

लहान मुलांना मोबाईल रील्सपासून दूर ठेवावे याबाबत मार्गदर्शन बाल मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. वर्ष वैद्य यांनी केले.

विषयावर विस्ताराने सांगितले. ऑटिझम आणि अपस्मार यांची लक्षणे अनेकदा सारखीच दिसतात. मेंदूतील रसायनातील बिघाड हे दोन्ही

मागील कारण आहे. मात्र ऑटिझम किंवा स्वमग्नता ही अवस्था आहे तर अपस्मार हा आजार आहे. तापेत येणारे झटके हे बऱ्याचवेळा

काळजी घेणे गरजेचे

अशा मुलांची काळजी घेणे गरजेचे असते, असेही डॉ. वैद्य यांनी सांगितले. झटका आल्यानंतर करावयाच्या उपाययोजना आणि काय करू नये याबाबत सविस्तर-पणे मार्गदर्शन केले.

मुलाच्या जन्मानंतर मुलाच्या मेंदूवर परिणाम होऊन त्याच्या वाढीवर परिणाम होतो.

तात्पुरते असतात. ते औषधोपचाराने कमी होतात. तथापि. मुलाला गर्भधारणेतील गुंतागुंत, तणाव यामुळे मुलाच्या जन्मानंतर मुलाच्या मेंदूवर परिणाम होऊन त्याच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे एक ते पाच वर्षापर्यंत मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवा. कुठेही अनियमितता दिसली तर

धोक्याचा इशारा समजावा आणि डॉक्टरचा सल्ला घ्यावा

धोक्याचा इशारा समजावा आणि डॉक्टरचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेत आरंभचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अश्विनी वांढेकर, विजयश्री जाईबहार, पल्लवी सोनावणे आणि नीलिमा वावरे या आरम्भ्च्या शिक्षकांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. वाढत्या वयात मेंदूत झपाट्याने बदल

एक ते पाच आणि दहा ते पंधरा हा वयोगट मेंदूतील रसायनात झपाट्याने बदल होणारा

एक ते पाच आणि दहा ते पंधरा हा वयोगट मेंदूतील रसायनात झपाट्याने बदल होणारा असतो. स्वमग्न मुलांच्या मेंदूतही या वयात झपाट्याने बदल होत असतात. त्यामुळे या काळात अपस्माराचा (एपिलीप्सी) झटका येण्याची शक्यता वाढते. अनेकदा स्वमग्न मुलाच्या वाढत्या वयात अपस्मार सोबती म्हणून येतो, असे डॉ. वर्ष वैद्य यांनी सांगितले.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.