लासूरला माणूसकीला काळिमा,जालन्याच्या तरुणीचा गळा आवळून खून,नंतर शेतवस्तीवरील घरात खड्डयात पुरले…
शिल्लेगाव पोलिसांनी जालना पोलिसांच्या मदतीने सहा दिवसांनी विवस्त्र अवस्थेत काढला मृतदेह,नातलगाचा आक्रोश…….

विवस्त्र अवस्थेत काढला मृतदेह
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे माणूसकीला काळिमा फासणारी घटना घाली असून जालना येथील
मोनिका मार्कस झांबरे (वय 30 वर्ष ) हिचा गळा आवळून खून करून दायगाव रोडवरील शेतात असणाऱ्या घरात खड्डा घेऊन त्यात विवस्त्र अवस्थेत पुरले आज शुक्रवारी 14 फेब्रुवारीला शिल्लेगाव पोलिसांनी जालना कदीम पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने खुणाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

विवाहित युवती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादातनगर येथील दवाखान्यात नर्स
दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की जालना येथील मोनिका मार्कस झांबरे (वय 30 वर्ष)ही विवाहित युवती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादातनगर येथील दवाखान्यात नर्स म्हणुन कामं करत होती मात्र तीचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील सुमित निर्मळ याच्याशी झालेला होता मात्र त्यांच्यात वारंवार वादविवाद होतं असल्याने ती जालना येथे आईवडिलांकडे राहत होती त्यामुळे ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेने अपडाऊन करत होती.
इरफान शेख जहागीरदार याच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले
मात्र 6 फेब्रुवारीला ती नियमितपणे रेल्वेने जालना येथे घरी न पोहचल्याने तीची आई सुनीता झाबंरे यांच्या फिर्यादीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे तपास केला असत्ता गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील इरफान शेख जहागीरदार याच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले ही बाब कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नांगरे यांनी मयत मोनिका हिची आई सुनीता झाबरे यांनी लासूर स्टेशन येथील पोलीस ठाणे गाठले.
सहा तारखेला पुरलेला मृतदेह आज 14 तारखेला बाहेर काढले
इरफान याने त्याच्या इनामी जमिनीत असणाऱ्या घरात मृत मोनिकाला खड्डे करून पुरले होते ते ठिकाण दाखवले असता ग्रामपंचायत कर्मचारी वं नागरिकांच्या मदतीने सहा तारखेला पुरलेला मृतदेह आज 14 तारखेला बाहेर काढुन घटनास्थळीच शवंविच्छेदन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी शुभम कोणेरी यांनी दिली असून गळा आवळून खून केल्याचीही माहिती दिली आहे.
शेतातील पत्र्याच्या रुम मध्ये नेवुन नग्न करुन तिच्यावर बलात्कार
दरम्यान मयत आईच्या जबाबनुसार जावई सुमित निर्मळ, सासु सपना निर्मळ,सासरे, संजय निर्मळ यांचे सांगणे वरुन ईरफान शेख रा.लासुर स्टेशन याने माझी मुलगी मोनिका निर्मळ हिस लासुर स्टेशन येथे बोलावुन घेवुन तिस सोबत घेवुन त्याचे शेतातील पत्र्याच्या रुम मध्ये नेवुन नग्न करुन तिच्यावर बलात्कार करुन तिचा गळा दाबुन खुन केला आहे.

प्रेत कोणास दिसु नये म्हणुन त्याचेच पत्र्याचे रुम मध्ये गड्डा
तिचे प्रेत कोणास दिसु नये म्हणुन त्याचेच पत्र्याचे रुम मध्ये गड्डा करुन दफन करुन पुरावा नष्ट केला आहे अश्या जबाब शिल्लेगाव पोलिसांत दिला आहे दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक योगेश खटाने, आदींसह शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी हजर होते या ठिकाणी मृत महिलेचे नातलग व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती मात्र पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन चोख बंदोबस्त ठेवला होता.