“क्या करे न क्या करे” कैसी मुश्कील है
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीनंतर एकनाथराव जाधव यांच्या भाजप बैठकांना अनुपस्थिती दिसायची.परंतु विधानसभेत झालेल्या राजकीय उलथा-पालथीनंतर “क्या करे न क्या करे” कैसी मुश्कील है …अस वातावरण बनल .
अपक्ष निवडणूक लढतानाच आपल्या प्रचारात ते नेहमी सांगायचे की,मी कुठेही गेलो नाहीत मी भाजपमध्येच आहे..अस ते ठणकावून सांगायला विसरत नव्हते.
जाधव ही निवडणूक अपक्ष लढले परंतु दुसऱ्या पक्षात गेले नाही
अपक्ष निवडणूक लढल्याने पक्ष कार्यकारीणी फारसे नाराज नसल्याची चर्चा होती. कारण जाधव ही निवडणूक अपक्ष लढले परंतु दुसऱ्या पक्षात गेले नाही म्हणून एकनाथरांवांनी थेट फील्डींग लावत भाजप पक्षात पुन्हा अधिकृत कमबँक केल.

तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा सहारा म्हणून मिळवली ओळख.
रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात देत….अनाथांचा नाथ एकनाथ
गोर-गरीब आणि इतर पक्षातून अमाप अत्याचार सहन करून आलेल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मदत करून ,वाईट परीस्थितीत एकनाथराव त्यांच्या पाठीशी ऊभे असतात.याशिवाय इतर पक्षात ज्या कार्यकर्त्यांना मानाचे स्थान नाही अशा कार्यकर्त्यांच माहेर म्हणजेच एकनाथरावांचे घर …! रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात देत….अनाथांचा नाथ एकनाथ हे वाक्य नेहमीच चर्चेत येत.

वैजापूर भाजपात पुन्हा जोश …पुन्हा जोम कायम झाला आहे. कारण दुसरी फळी म्हणजेच कार्यकर्त्यांना एकनाथरावांचे कमबैक सुखावणारे ठरणार हे माञ नक्की…!

जाधव यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
मागील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्य कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत पुन्हा सन्मानाने भाजपमध्ये प्रवेश घेतला. जाधव यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यापुढील काळात जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कळकट करण्यासाठी संघटनात्मक काम करू
निवडणुक झाल्यानंतरही जाधव यांनी पक्ष कार्य सुरूच ठेवले
अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. पक्ष प्रवेशामुळे जल्लोष करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेची निवडणुक झाल्यानंतरही जाधव यांनी पक्ष कार्य सुरूच ठेवले होते. तसेच एकनाथ जाधव मित्र मंडळातर्फे शहरात फलकही लावण्यात आले होते. त्यामुळे जाधव हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते.
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांच्यासोबत अमन जाधव, नारायण तुपे, नारायण काटे, काटे, उदय सोनवणे, अशोक शेळके आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.