‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना गरिबांसाठी असल्यामुळे ती सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी काही नवीन निकष घातले जाणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून सरकार पैसे परत घेणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत काही नवीन अटी-नियम लावले जाणार असल्याची चर्चा असून लाडक्या बहिणींच्या घरी तपासणीही सुरू झाली आहे.
असे असतानाच अजित पवार यांनी त्यावर प्रथमच भाष्य केले आहे. ते म्हणाले

लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठीच
राज्यातील मजुरी, कष्टकरी, घरकाम करणाऱ्या महिला अर्थात ज्या राज्याच्या इतर कुठल्याही योजनांचा लाभ घेत नाहीत, त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली होती.
मात्र आर्थिक सक्षम असलेल्या काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निवडणुकीनंतर शासनाच्या लक्षात आले. त्यांना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

गरीब महिलांसाठी ही योजना सुरूच राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी काही नियम व अटी घालण्याचा विचार राज्य सरकारने केला होता. मात्र, चर्चेच्या पातळीवरच हा विषय राहिल्याने त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.

त्यामुळे घरी चारचाकी वाहन असलेल्या व वीस हजारांवर वेतन घेणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला. सरसकट योजनेची अंमलबजावणी झाल्याने पैसे वितरित झाले.
निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनीही लाभ घेतला
परंतु, निवडणुका पार पडल्यानंतर सरकारच्या लक्षात आले की, यात निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनीही लाभ घेतला आहे.
त्यांना योजनेतून बाहेर पडण्याची विनंती केल्यानंतर राज्यातील पाच लाख महिला स्वतः या योजनेतून बाहेर पडल्याचेही त्यांनी सांगितले.