पक्षप्रवेशाने, उंचवल्या भुवया,नगरपालिका निवडणूकीत नशीब आजमवणार डॉ राजीव डोंगरे!
वैजापूरच्या राजकारणात मागील एक वर्षात अनेक महत्वपुर्ण हालचाली घडल्या कित्येक नेत्यांनी पक्ष सोडले तर काहींनी घरवापसी केली.अशातच शिवसेना ऊबाठाला राम-राम केल्यानंतर डॉ राजीव डोंगरेंनी विधानसभेच्या आखाड्यात आमदार बोरनारेंना मदत केली.यांमुळे अख्खी निवडणूक होईपर्यंत प्रत्येक सभा,सभांमध्ये भाषणे आणि शेवटी मतांच्या गोळा-बेरजेत डोंगरेंकडूनसुद्धा बोरनारे यांच्या मतांच् पारडे जड करण्यासाठी हातभार लागला.

यांमुळे डॉ राजीव डोंगरे हे पुन्हा चर्चेत राहीले.2019 च्या विधानसभेत डॉ राजीव डोंगरेंनी विधानसभा निवडणूकीत डोंगरे यांना दहा हजाराच्या आसपास मते मिळाली होती.या विधानसभा निवडणूकीत डॉ राजीव डोंगरे हे आमदार रमेश बोरनारेंसोबत असल्याने अप्रत्यक्षरीत्या डोंगरेंची मतेही बोरनारे यांना मिळाल्याची चर्चा आहे.त्यामुळे माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर,डॉ राजीव डोंगरे,भागिनाथ मगर,यांच्यासह संतोष जाधव ,अभय पाटील हे सुद्धा बोरनारेंसोबत या निवडणूकीत दिसल्याने प्रा बोरनारेंचा विजय निश्चीत दिसत होता.

विधानसभेला विजयश्री खेचून आणल्यानंतर आमदार बोरनारे आता नगरपालिका ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.यासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू करून पक्षप्रवेश आणि विकासकामांवरती बोरनारे लक्ष ठेऊन आहेत.नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी पुरवणी मागणीत वैजापूर नगरपालिकेच्या जलशुद्धिकरण प्रकल्पाचा विषय चर्चेत आणला.याशिवाय शहरासाठी कायममस्वरूपी पाण्यासाठी एक स्वतंञ प्रकल्प ऊभारला जावा असेही त्यांनी मागणी केली.

डॉक्टर विरूद्ध डॉक्टर
वैजापूर नगरपालिका निवडणूकीकरीता आता यावेळी डॉक्टर विरोधात डॉक्टर चेहरा समोर येईल अशी चर्चा आहे.यापुर्वीच मकरसंक्रांतीच्या पार्श्वभुमीवर क्रांतीनाना मळेगांवकरांचा ‘ खेळ पैठणीचा’ हा भव्य दिव्य कार्यक्रम महीलांसाठी डोंगरे दांपत्याने राबवीला या कार्यक्रमास हजारो महीलांसह पुरूष मंडळींचीही उपस्थिती होती.हा कार्यक्रम अतिशय चर्चेत ठरला अन शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या कार्यक्रमामुळे डॉ डोंगरे हे नगरपालिका निवडणूकीची तयारी करत असल्याचे निश्चीत झाले.

दोन्ही आमदारांसोबत डोंगरेंचा सलोखा अन जवळीक
वैजापूर तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार भाऊसाहेब तात्यांसोबत डॉ डोंगरेंची जवळीक होतीच.परंतु आमदार बोरनारेंसोबत खांद्याला-खांदा लावत मतदारसंघ पिंजून काढून आमदार बोरनारेंच्या विजयात कुठलीच कसर न ठेवल्याने बोरनारे हे डोंगरेंच्या मेहनत आणि निष्ठेवर मेहरबान आहेत.यांमुळे राजकीय ताकदीच्या बाबतीत दोन्ही आमदार डोंगरेंसोबत आहे.

नुकताच शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ असलेले डॉ. राजीव डोंगरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळा पार पडला.

शिंदेंच्या मुक्तगिरी निवासस्थानी वैजापूर तालुक्याचे आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यानंतर डोंगरे हे आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणूकीत आपले नशीब आजमावतील अशी चर्चा शहर ग्रामीणमध्ये जोर धरून आहे .
