शेतकऱ्याच्या मुलाचे मोबाइल विक्री क्षेञात ‘पुढचं पाऊल’
हजारो अपयशानंतर गाठले यशशिखर!
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील बल्लाळी सागज गावचा नवतरूण, रवी जगताप 2010 ला वैजापूरला आले, केवळ मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काहीतरी क्रांती करण्याचा मानस होता.
म्हणून वैजापूर सारख्या ठिकाणी राम नवमीच्या दिवशी सन 2010 ला या साईश्रद्धा नामाक मोबाईल विक्री व दुरूस्तीच्या दुकानाची सुरुवात करण्यात आली .

त्यानंतर नुसते मन असून मोबाईल व इलेक्ट्रॉनिक धंद्यात यशस्वी नाही होऊ शकत त्यामुळे त्यांनी योग्य प्रशिक्षणासाठी इतर ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न केला.
पुढे स्वतःचे दुकान पण सुरू ठेवले ,पण म्हणावे तेवढे यश मिळत नसल्या कारणाने 2014 ला ते दिल्लीमध्ये मोबाईलचा कोर्स सॉफ्टवेअर व हार्डवेअर पूर्णपणे तंतोतंत काम यावं म्हणून जगताप यांनी मोबाईल कोर्स केला.
तीन महिने कोर्स केल्यानंतर त्यांच्यासोबत शिकणाऱ्या मुलांमध्ये भरपूर मुलं बाहेरच्या देशातील आलेले होते .रवी यांची बुद्धिमत्ता बघून त्यांना ऑफर केली की तू पण आमच्या सोबत दुबईला चल ,पण रवीला स्वतःचे काहीतरी अस्तित्व तयार करायचे होते, म्हणून त्यांनी पुन्हा आपल्या दुकानला सुरूवात करण्याकरीता वैजापूर मध्ये हालचाली सुरू केल्या.

त्यानंतर दुकानाची जागा बदलण्याकरिता डिपॉझिट व पैसे नसल्या कारणाने डेपो रोडला छोट्याशा जागेत दुकान थाटलं अन त्यानंतर खरी सुरुवात झाली नव्या क्रांतीला…
बल्लाळी सागज ते वैजापूर 22 किलोमीटर अंतर दररोज सकाळी सात वाजता वैजापूरला यायचं ,संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवायचं हा दिनक्रम.

अडचणीच्या काळात थोडी थोडी बचत करत , बचत झालेल्या पैशाची इन्व्हेस्टमेंट नवीन मोबाईल मध्ये करत राहीले.एका बाजूला मोबाईल रिपेरिंग आणि सॉफ्टवेअर व मोबाईल विक्री करत राहिले. त्या स्वरूपात मोबाईल रिपेरिंग व मोबाईल विक्रीमध्ये त्यांना यश भेटल.
परीस्थिती ,लोकनिंदेला न घाबरता आपण आपलं काम सुरू ठेवल तर अपयश कोटीने येऊद्या,परंतु या अपयशाला जिद्द ,चिकाटी,मेहनत आणि आत्मविश्वासापुढे हराव लागत अशा वेळी तुमच्या कष्टाच चीज होऊन यशाचा मार्ग मोकळा होत असतो.
रवी जगताप
मोबाइल विक्रेता