ताज्या बातम्या बिंदास राजकारण

एकनाथराव जाधव यांचा ठाम निर्णय -विधानसभा लढविणारच !

राज्यात १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता बिगुल वाजला आणि सर्वांच लक्ष वेधल गेल ते म्हणजे वैजापूर च्या राजकीय वलयात चर्चेत असलेल्या चेहऱ्यांकडे महायुती कडून आपणच उमेदवार राहू असेही एकनाथ राव जाधव
यांनी आपल्या दौऱ्यावेळी सांगितले. कि, काहीही झाल तरी आपण विधानसभा लढविणारच… असा प्रण केला आहे.


२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना पक्षाची महायुती होती, यावेळी वैजापूर-गंगापूर विधानसभेत स्व.लोकनेते आर.एम.वाणी साहेबांच्या मदतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रा.रमेश बोरनारे यांना
उमेदवारी दिली होती .

त्यावेळी शिवसेना आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ताकद लावत बोरनारे यांना लाख मतानी आमदार केले.मात्र आपल्या संवाद यात्रेदरम्यान भाजप कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव
यांनी भाजप कार्यकर्त्यांना विचारात न घेतले गेल्याने आम्ही हि निवडणूक लढविणारच असा प्रण केला आहे.यामुळे तिकीट मिळाले तर पक्षाकडून नाही मिळाले तर अपक्ष अशी भूमिका एकनाथ जाधव यांनी घेतली आहे.

आगामी काळात उमेदवारी अर्ज भरतानाच हे स्पष्ट होईल कि,कि कोण उमेदवार कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार?
मात्र सध्या दिसत असलेले चित्र ,पाहता, डॉ. दिनेश परदेशी हे महाविकास आघाडीकडून लढू शकतात. तर विद्यमान आमदार हे महायुतीच्या तिकिटावर लढू शकतात.याशिवाय जाधव हे अपक्ष असतील का यावर लवकरच शिक्कामोर्तब
होणार आहे. याशिवाय माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.