मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या चौफेर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील बळीराजा हा कसा सुखी होईल, त्याची चिंता कशी मिटेल, याचा सांगोपांग विचार करून ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निश्चितपणे काय फायदे देता येतील, याचा विचार मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.
सिंचनासाठी शेतकऱ्यांना नेहमीच विजेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल 2024 पासून 7.5 HP म्हणजेच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या क्षमतेच्या कृषी पंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 44 लाख शेतकऱ्यांना मोफत विजेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ही योजना जाहीर करताना राज्यातील शेतकऱ्यांना पुढील लाभ मिळतील, याचा विचार केला गेला. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचनासाठी मोफत वीज प्रदान केली जाईल. मोफत विजेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळेल, जे त्यांच्या शेतात 7.5 HP कृषी पंपाचा वापर करतात. मोफत वीज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार आहे, आणि हा लाभ राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी स्वावलंबी व्हावा, हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे नेहमीच धोरण आहे आणि त्यामुळे पीक सिंचन संबंधातील सर्व समस्या कमी होणार आहेत
अधिक पेरणी आणि सिंचनासाठी शेतकऱ्याना प्रोत्साहित करणे, यासाठी राज्य सरकार नेहमीच सतर्क आणि सज्ज असते, हे राज्यातील प्रत्येक शेतकरी जाणतो, त्यामुळेच या योजनेला मोठे यश मिळाले आहे.
या योजनेचा लाभ पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत दिला जाणार आहे. या बदल्यात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारकडून महावितरण कंपनीला 14 हजार 760 कोटी रुपये देण्यात येतील, असा निर्णय देखील शिंदे सरकारने घेतला आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सहा हजार 985 कोटी रुपये आवंटित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वीज दरांमध्ये सवलत देण्यासाठी अतिरिक्त 7 हजार 775 कोटी रुपये दिले गेले आहेत.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेले हे निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत