आरोप प्रत्यारोपात वैजापूरच राजकारण घिरट्या घालतंय
पण तुम्हाला माहितेय का या वैजापूर विधानसभेच्या वलयात आत्तापर्यंतचे निवडून गेलेले आमदार
वैजापूर मध्ये आर एम वाणी हे शिवसेनेत गेले आणि कैलास आबांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. यांवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते विभागली गेली.कैलास आबाचा पराभव करत आर एम वाणी यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला. यांमुळे शिवसेनेचा बालेकील्ला अशी वैजापूरची नवी ओळख निर्माण झाली. त्यानंतर शिवसेनेन पंचायत समिती, जिल्हा परीषदही काबीज केली. असे सांगितले परंतु स्वबळावर पक्ष निवडणूका लढविण्याचा विचारामुळे पुन्हा आर एम वाणींना ही निवडणूक लढवावीच लागली.
चिकटगांवकरांना राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली. बक्कळ मतदार वर्ग,भाऊ कैलास आबांची मिळालेली साथ आणि शेवटी नशिबाने साथ दिल्याने भाऊसाहेब तात्या निवडून आले आमदार झाले.
तरीही ठाकरे वाणींकडेच आग्रही होते. परंतु आर एम वाणी यांचा शब्द शास्वत सत्य होता.आपल्या उमेदवारीवर पाणी सोडत त्यांनी बोरनारे यांनाच विधानसभा उमेदवार घोषीत करण्यास ठाकरेंना भाग पाडलं. यातच भाऊसाहेब तात्या आणि अभय पाटील या काका पुतण्यांत राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली. राजकीय वादंग नको म्हणत तात्यांनी माघार घेतली आणि अभय पाटील विरूद्ध रमेश बोरनारे यांच्यात ही फाईट झाली. भाजप ने दिलेली मजबूत साथ आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा तगडा हाथ यांमुळे बोरनारे 98183 मते घेऊन आमदार झाले. अभय पाटलांना 40 हजाराच्या आसपास मते मिळाली.माञ आता राज्यात शिवसेना दोन झाल्या.एक ठाकरेंची दुसरी शिंदेंची दोन वर्षांपुर्वी बोरनारे यांनी शिंदेंची साथ देत.ठाकरेंना सोडलं. यांवेळी ही शिंदेसेना आणि भाजप एकञित लढण्याची चिन्हे दिसत असताना महायुतीचा उमेदवार बोरनारेच असतील यात शंका नाही पण यांवेळी भाजपकडून बोरनारेंना तालुक्यात फारशी मदत होणार नाही असा सल्ला जाणकारांकडून व्यक्त होत असतानाच भाजपचे प्रदेश कार्यकारीनी सदस्य एकनाथ जाधव यांनी साखरेत मिठाचा खडा टाकत तिकीट भाजपाला मिळणार असल्यांचे संकेत देत बोरनारेंवर भाजप नाराज असल्याच स्पष्ट केल.
दुसरीकडे भाजपचा तालुक्यातील सर्वात शक्तिशाली आणि सर्व जाती धर्माच्या जनतेला कायम न्याय देत असलेला नेता ठाकरेंच्या गळाला लागणार या बातमीने राजकीय वलयात खळबळ माजवलीय. दररोज काहीतरी नविन ट्विस्ट येत असल्याने या निवडणूकीत बोरनारे यांना चितपत करण्यासाठी शिवसेनेकडून तगड्या उमेदवाराच्या शोधात असलेले ठाकरे यांवेळी शिवसेनेकडून डॉ दिनेश परदेशिंना मैदानात उतरविन्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास टफ फाईट पहायला मिळेल.
एकूनच मतदारसंघात यावेळी काय घडत यांकड लक्ष लागलेल असताना भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर आणि एकनाथ जाधव यांच्या लढतीवरही काही गणित बदलू शकतात ..
शिंदेच्या साथीला जात बोरनारेंनी दगा केल्याचा राग उद्धव ठाकरेंना असल्याने ठाकरे मतदार संघ आपल्या ताब्यात ठेवण्याकरीता नेमके आणखी कुठले गेम प्लान करतात आणि आपला साथीदार पराभूत होऊ नये याकरीता शिंदे काय योजना आखतात हे पहाण औत्सुक्याचे ठरणार आहे.एकंदरीत सर,भाऊ तात्या,अन साहेबांशिवाय आणखी कोण रिंगणात उतरणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.