विटखेडा कानडगाव येथील सरपंचाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी
- संतोष गंगवाल
देवगाव रंगारी/छञपती संभाजीनगर
कन्नड तालुक्यातील विटखेडा कानडगाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. संगीताताई लक्ष्मण सवाई व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गोविंदराव सवाई यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी शुक्रवारी (ता २८)इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन त्यांना सरपंचाच्या वतीने भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सवाई यांनी सर्व जाती-धर्मात एकोपा कायम ठेवण्याचे महत्त्व सांगितले आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशावर भर दिला. या पवित्र संधीवर मुस्लिम बांधवांना एकत्र येण्याचे आणि एकमेकांना मदत करण्याचे आह्वान केले.

कार्यक्रमास सोसायटी चेअरमन देविदास पांडव, माजी सरपंच गोरख रावते, प्रा जाफर सैय्यद ,पोलीस पाटील जालिंदर जिते, कैलास सवाई ,भाऊसाहेब सवाई, गोरख कुकलारे, मच्छिंद्र शेलार, इलियास सय्यद, असलम सय्यद, हनीफ शाह आणि सर्व मुस्लिम बांधव तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते.
सरपंच संगिता लक्ष्मण सवाई यांनी गावातील मुस्लिम महिलांना शिरखुर्मासाठी शिरखुर्मा ग्लासचे बॉक्स वाटप करण्यात आले.
यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच सौ. संगीताताई सवाई व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष. लक्ष्मण सवाई यांचे हार्दिक अभिनंदन व आभार मानले जातात.