वैजापूर:छञपती संभाजीनगर
तालुक्यातील वळण परिसरातील धक्कादायक घटना.
तालुक्यातील वळण येथे शेतवस्तीवर घरासमोर खेळत असलेल्या मुलीवर,बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.ऋतुजा सचिन कर्डक वय ३ वर्षे राहणार तांदूळवाडी तालुका गंगापूर असे घटनेतील मयत मुलीचे नाव आहे.
या घटनेबाबत घटनास्थळावरून मिळालेले माहितीनुसार.
ऋतुजा ही आपल्या आई सोबत मामाच्या गावी वळण येथे आलेली होती.शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक मुलीवर हल्ला केला.
या हल्ल्यात बिबट्याने मुलीला शंभर फूट घेऊन गेल्यानंतर उपस्थित परिवारातील सदस्यांनी त्याच्या मागे धाव घेतल्या. बिबट्या तिला कपाशीच्या शेतात सोडून पसार झाला. या घटनेत
मुलगी गंभीर जखमी झाल्याने.

नातेवाईकांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने.
तिला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र सायंकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच मुलीच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातच हंबरडा फोडला,मुलीच्या नातेवाईकांचा आक्रोश बघून उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांचे ही डोळे पाणावले.