चिंचोली लिंबाजी येथे आमदार संजना जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित रावसाहेब पवार यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कन्नड तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या : संजना जाधव

केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे २० वर्षांनंतर कन्नड तालुक्याला सत्तेत सहभागी होण्याचा योग आला आहे. या संधीचे आपल्याला सोने करायचे आहे. यासाठी गावातील गटातटांचे राजकारण बाजूला करून सर्वांनी तालुक्याचा विकास करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन आमदार संजना जाधव यांनी केले.
आमदार जाधव यांच्या सत्काराचे चिंचोली लिंबाजी येथे ग्रा.पं. सदस्य
रावसाहेब पवार मित्रमंडळाच्या वतीने आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास आयोजक रावसाहेब पवार, किरण पवार, भूषण पवार, रामेश्वर पवार, काकासाहेब पवार, दिलीप पवार, सचिन जैस्वाल, संजय पवार, पंढरी बावस्कर, पंडित पवार, रामचंद्र बावस्कर, मनोज बावस्कर, भीमराव पवार, बाबू तायडे, नारायण तायडे, भाऊसाहेब पवार, अशोक भुजंग, दीपक सोने, कैलास घुले, आदींची उपस्थिती होती