ताज्या बातम्या बिंदास Agro

वैजापूर बाजार समिती व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ! आता 10 लाखांची बँक गँरंटीची अट

वैजापूर बाजार समिती व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ! आता 10 लाखांची बँक गँरंटीची अट

छञपती संभाजीनगर च्या वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ,समितीच्या लिलावात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला १० लाख रुपयांची बँक गॅरंटी किंवा तेवढ्याच रकमेचा मालमत्तेवर बाजार समितीचा बोजा नोंदविणे, तसेच संबधित व्यापाऱ्याला जामिनदाराची २० लाख रुपयांची हमी बंधनकारक, अशी नवीन नियमावली नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नवीन आर्थिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांकडून उधारीत कांदा खरेदी करून तब्बल २ कोटी रुपयांची सागर राजपूत या व्यापाऱ्याने फसवणूक

केली होली का प्रकरणात फसवणूक परवानाधारक व्यापाऱ्यांबाबत आता सावध भूमिका घेतली आहे. त्यानुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली.

या बैठकीत नवीन आर्थिक वर्षापासून नवीन नियमावलीची लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी २१ पैकी सभापती रामहरी जाधव यांच्यासह १८ संचालक उपस्थित होते. त्यापैकी २ व्यापाऱ्यांनी या नव्या नियमावलीला विरोध केला. उर्वरित १६ संचालकांनी त्यास मंजुरी दिली. त्यानुसार परवानाधारक व्यापाऱ्यांना १० लाख रुपयांची बँक गॅरंटी किंवा तेवढ्या रकमेचा सातबाऱ्यावर बाजार समितीचा बोजा टाकण्यात यावा तसेच संबधित व्यापाऱ्याला जामीन देणाऱ्याची २० लाख रुपयांची हमी बंधनकारक करण्यात आली आहे.

संचालकांच्या बैठकीत निर्णय

२० लाख रुपयांची जामीनदाराची बँक हमी संबंधित व्यापाऱ्याला बंधनकारक राहणार आहे, अशी नवीन नियमावली नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नवीन आर्थिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी २१ पैकी सभापती रामहरी जाधव यांच्यासह १८ संचालक उपस्थित होते. त्यापैकी केवळ दोन व्यापाऱ्यांनी या नियमावलीला विरोध केला होता.

फसवणूक प्रकरणामुळे घेतला निर्णय
शेतकऱ्यांनी बाजार समितीचे
१ लिलाव आठवडाभर बंद पाडले होते. शिवाय बाजार समितीला स्वतःच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागले.

त्यामुळे भविष्यात असा प्रकार घडू नये, यासाठी व्यापारी परवानाच्या नियमावलीत सुधारणा करण्याची सूचना आ. रमेश बोरनारे यांनी सभापती रामहरी जाधव व संचालकांना दिली होती.

त्यानुसार बाजार समितीच्या 3 संचालक मंडळाने कठोर निर्णय घेतले आहेत.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.