शिवसेना ठाकरे गटाला जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठे भगदाड पडले आहे. ठाकरे गटाच्या दहा माजी नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.७) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला शहरात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून शहरात शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. आतापर्यंत शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात तर काहींनी भाजपात प्रवेश केला आहे.

मागील महिन्यातच ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह ३५ जणांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले यांनी देखील एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतलेले नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, मनपा माजी सभागृह नेता किशोर नागरे, मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, रूपचंद वाघमारे, माजी नगरसेविका स्वाती नागरे, ज्योती वाघमारे, मीना गायके, ज्योती पिंजरकर, सीमा खरात यांचा सामावेश आहे.
शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरे गटाची आऊट गोईंग थांबायला तयारी नाही. अशातच शुक्रवारी ठाकरे गटातील आणखी १० माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्वांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
यावेळी खा. संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.