महायुतीविरोधात जनतेला भडकवण्याचा माविआ नेत्यांचा प्रयत्न..असल्याचा आरोप शिंदे ,फडणविस,पवारांनी केला आहे.
अनेक वेळा, राजकीय गटांकडून खोटी माहिती पसरवण्यात येते, आणि मविआ यामध्ये मागे राहिलेली नाही. त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते सतत सोशल मिडियावर विविध प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. अलीकडेच, उबाठा गट आणि रोहित पवार यांचे काही नवीन पोस्ट्स चर्चेत आले आहेत.
या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जुने व्हिडीओ शेअर केले आहेत, जे चार वर्ष जुने आहेत. त्यात पैसे पकडण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. महायुती नेत्यांच्या मते , हे खरे नाही. या प्रकारच्या भ्रामक माहितीमुळे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो, आणि त्यामुळे एक प्रकारचा भयंकर संदेश समाजात पसरतो. पराभवाच्या भीतीने अस नीच कृत्य आघाडीचे नेते करत असल्याची टिका त्यांनी केली आहे.
काल, “लाडकी बहीण योजना” बंद होण्याबाबत फेक न्यूज पसरवली गेली.
आचारसंहितेत मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना तात्पुरत्या स्थगित केल्या जातात, मात्र महायुती सरकारने पुढील २ महिन्यांचे पैसे अडव्हांस मधे अगोदरच महिलांच्या खात्यात जमा केले आहे.
लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाकडून थांबवली गेल्याची फेक न्यूज मविआ कडून पसरवली जात आहे. या प्रकारच्या खोटी माहितीच्या माध्यमातून, लोकांना येड्यात काढायचं काम हे लोक करत असल्याचेही महायुतीच्या नेत्यांनी म्हटल आहे. फेक न्यूजचा प्रभाव केवळ राजकारणातच नाही तर समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात होतो. हीच का रोहित पवार व शिवसेना उबाठाची सामाजिक जबाबदारी असा सवाल आता जनता विचारील . आणि जनतेला या फेक न्यूजच्या फॅक्टरीविरुद्ध जागरूक राहायला हवे.असही महायुतीच्या नेत्यांनी म्हटल आहे.