वैजापूर विधानसभेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काही ठीकाणी लढण्यासाठी तर काही ठीकाणी पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. सरकारने मराठा समाजास आरक्षण न दिल्याने नाराज असलेले मनोज पाटील जरांगे आता नवी खेळी खेळणार आहे. यासाठी ता 20 ऑक्टोबरच्या त्यांच्या बैठकीत काही ठीकाणी लढणार ,काही ठीकाणी पाडणार ची भुमिका स्पष्ट करत ..इच्छूक उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. आता कसं पाटील म्हणतील तस म्हणत वैजापूर विधानसभा निवडणूकीत आपल्याला मनोज पाटील जरांगेंचा उमेदवार दिसणार आहे. याच प्रामुख्याने काही नांवे चर्चेत आहेत.
नजर टाकूयात या चेहऱ्यांवर..
प्रशांत पाटील सदाफळ
हे जेव्हापासून आरक्षणासाठीची आंदोलन मोहीम सुरू झालीय तेव्हापासून,समाजासाठी काम करत आहेत.त्यांच्या सोबतीला बोरसरचे सुनिल बोडखे ,सोमनाथ मगर हे सुद्धा अनेक ठीकाणी काम करताना पहायला मिळाले.सदाफळ यांनी कुणबी प्रमाणपञाची मोहीम सुरू झाल्यानंतर इत पासून इतिपर्यंत म्हणजेच नांवे शोधून प्रमाणपञ देण्यापर्यंत कार्य केले आहे.याशिवाय वैजापूर येथे जरांगे पाटीलांची झालेल्या सभेत अनेक मराठा समाजातील नामवंत चेहऱ्यांनी सभेसाठी पुढाकार घेत ,भव्य सभेचे आयोजनही केले होते.त्यामुळे प्रशांत सदाफळ यांच नांव प्राथमिक चर्चेत आहे.
दुसरे नांव म्हणजे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर
यांनी शिवसेना ऊबाठा सोडचिट्ठी दील्यानंतर जरांगे पाटलांसोबत संपर्कात गेले.अगदीच दसरा मेळावा ,मुलाखत बैठकीस ही ते हजर होते. त्यामुळे त्यांनीही तिकीटाची मागणी केल्याचे समजते. अगोदरच माजी आमदार त्यात तिकीटाची मागणी यांमुळे तात्यांनाही उमेदवारी मिळू शकते
तिसरे चर्चेतील नांव म्हणजे
अजय पाटील साळुंके ..यांनी मराठा आरक्षणासाठी सपत्नीक अनेकदा ऊपोषण केलीत.गावोगांवी मशालफेरीही काढली. त्यामुळे समाजासाठी त्यांच योगदान लक्षात घेता त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
या सर्वांशिवाय चंद्रकांत कटारे, भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य एकनाथराव जाधव,जे के जाधव ,नबी पटेल यांनीही तिकीटासाठी जरांगे पाटलांकडे रेटा लावल्याचे समजते.
परंतु नक्की उमेदवारी कुणाला मिळणार यावर अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याने भुमिका स्पष्ट होत नाही.तिकीट तर कुण्या एकालाच मिळणार हे माञ तितकेच खर ..पाटील म्हणतात तस पाडायच की लढायच यांवर मतदारसंघात निर्णय होऊ शकतो