ताज्या बातम्या बिंदास महाराष्ट्र

सरकारच्या धोरणांमुळे राज्याच्या प्रगतीस चालना-एकनाथ शिंदे

महायुती सरकारची , दमदार कामगिरीमुळे आणि
सरकारच्या धोरणांमुळे राज्याच्या प्रगतीस चालना मिळाली असल्याचे मत महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केले.
अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांची सुरुवात…केली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी करत आपल्या ४० आमदारांसह पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली. या सरकारने मागच्या अडीच वर्षात दमदार कामगिरी करत विविध विकास प्रकल्प पूर्ण केले आहेत.

यामध्ये एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बनत आहे. ७६ हजार कोटींचा हा प्रकल्प असून यातून १२ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे, शिवाय स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळेल. दुसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नागपूर आणि मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग.

या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांतुन निर्यातीसाठी वाहतूक जलद होणार असल्याचे मत महायुती नेत्यांनी व्यक्त केले. तसेच शेती संबंधीत प्रक्रिया उद्योग, नवीन उद्योगधंदे यांना मालवाहतुकीस हा मार्ग फायदेशीर ठरेल.

पुणे, मुंबई, नागपूरमध्ये राज्यसरकारने मेट्रोच्या कामाला गती दिली ज्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येपासून नागरिकांची सुटका होईल. असेही नेतेमंडळी सांगत आहेत.

आणि शहरांतर्गत प्रवास करणं सुखकर होईल. वैनगंगा- नळगंगा, नार – पार – गिरणा, वैतरणा – गोदावरी इ. नदी जोड प्रकल्पांनाही सरकारने आपल्या अडीच वर्षाच्या काळात मंजुरी दिली. विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा..मात्र यावरही तोडगा काढण्याचे काम राज्य सरकारने केलंय.

पश्चिम वाहिनी नद्यांतून समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाडा आणि विदर्भात वळवून तेथील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या संपवण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं.

आणि
विविध धरण प्रकल्प, वंदे भारत सारख्या रेल्वे, रेल्वे मार्गांचा विकास, अनेक नवीन विमानतळे, जसे की नवी मुंबई, सोलापूर, पुणे, नाशिक, शिर्डी अशी नवी विमानतळे महायुती सरकार उभारते आहे. यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

राज्याच्या आणि देशाच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार काम करतंय. सरकारच्या या प्रयत्नाला आगामी निवडणुकीत आपणही आम्हाला साथ द्यायला हवी…असे आव्हाहण महायुतीने मतदात्यांना केल आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.