छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या नेतानगरी

विकासात्मक दृष्टिकोण आणि सुशिक्षित चेहऱ्याला संधी द्या-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे डॉ. दिनेश परदेशींसाठी मतदारांना आवाहन

छत्रपती  संभाजीनगर : वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या बाबतीत सामाजिक, आर्थिक, कृषी, पायाभूत सुविधा व मूलभूत विकासात्मक दृष्टिकोण ठेवणाऱ्या आणि सुशिक्षित चेहऱ्याला संधी द्या असे मतदारांना शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डॉ.दिनेश परदेशी यांच्यासाठी आवाहन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांच्या वतीने वैजापूर मतदार संघातील मतदारांशी संपर्क साधावा या हेतूने सुरू केलेल्या शिवसंवाद यात्रेनिमित्त झोडेगाव येथील गावकऱ्यांशी शुक्रवार, ता. २५ ऑक्टोंबर रोजी संवाद साधला.

वैजापूर विधानसभा मतदार संघात स्वर्गीय आर.एम. वाणी यांच्या सारखे सक्षम नेतृत्व असताना २०१९ साली पक्षाने भाकरी फिरवून गद्दार आमदाराला तिकीट दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या गद्दारावर एवढे उपकार करून सुध्दा शेवटी त्याने दोन वर्षांपूर्वी पक्षाशी गद्दारी करुन पक्षाचा अपमान केला. आगामी विधानसभा निवडणुकीत या गद्दाराच्या पराभवासाठी अत्यंत जोमाने काम करायचे असल्याचे जाहिर प्रतिपादन दानवे यांनी केले.

दोन वर्षांपूर्वी पक्षाशी बंड केलेल्या आमदारांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेल्यानंतर गद्दार म्हणून हिणावले जाते. सर्वत्र महाराष्ट्र यांची गद्दार म्हणून ओळख सर्वश्रुत झाली आहे. विधानसभा मतदारसंघात गद्दार गटाचे आमदार 3 हजार कोटीचे काम केले असल्याचे पत्रक संपूर्ण मतदारसंघात वाटत आहे. परंतु सातत्याने या भागात मी फिरत असताना सदरील निधीच्या माध्यमातून एकही काम झाल्याचे दिसत नाही. सर्व कामे कागदपत्रावरच असल्याची टीका यावेळी अंबादास दानवे यांनी केली.

तालुक्यातील रामकृष्ण उपसा जलसिंचन प्रकल्पातील अधिग्रहित शेतकऱ्यांच्या १४५ कोटी रूपये कर्ज माफीची हमी देऊन सातबारा कोरा करण्याची हमी स्थानिक आमदारांने दिली होती. यापैकी ६५ कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले असल्याची ग्वाही ते देत असले तरीही प्रत्यक्षात ६५ रुपये सुद्धा आले नाही. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाचे काम आर. एम. वाणी यांच्यानंतर प्रलंबितच असल्याची,माहिती देऊन शेतकऱ्यांना या आमदाराने फसवले असल्याची गंभीर टीका दानवे यांनी यावेळी केली.

स्वतःला सुशिक्षित व्यक्ती हे आमदार म्हणत असले तरीही प्रत्यक्षात याला अनुसरून त्यांची कसलीही कृती दिसत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून २०१९ साली उमेदवारी दिली होती. परंतु या उपकाराची जाण न ठेवता त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यावर मला असता आहे. शेतकरी, कष्टकरी व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असून तिला पाठिंबा द्या अशी विनंती वजा आवाहन उमेदवार दिनेश परदेशी यांनी केले.


याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे,अंकुश सुभ, लक्ष्मण भाऊ सांगळे, माजी उपनगराध्यक्ष हाजी अखिल शेठ, विधानसभा संघटक मनाजी पाटील मिसाळ, तालुका प्रमुख सचिन वाणी, सुभाष कानडे, तालुका संघटक मनोज गायके, प्रकाश चव्हाण,युवासेना जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल,महिला आघाडी जिल्हा संघटक लताताई पगारे, रविंद्र पोळ, दादा जगताप, विश्वजीत चव्हाण, वाल्मिक शिरसाठ, विठ्ठल डमाळे, अरुण शेलार, अक्षय साठे, दीपक मनसागर व गणेश कदम उपस्थित होते.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.