छञपति संभाजीनगर हा अनेक वर्षांच्या सत्ताकारणात मंञीपद घेणारा जिल्हा ठरला आहे.
माञ छ संभाजीनगरच्या सर्वच जागा महायुतीने जिंकल्यानंतर शिवसेना आणि भाजपमधून यावेळी मंञीपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
सिल्लोड विधानसभेतून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दूल सत्तार यावेळी मंञीपदापासून दूरावले जाऊ शकतात कारण जिल्ह्यातील प्रत्येक भागात ठाकरेंच्या शिवसेनेशी त्यांचा थेट संबंध असल्याने मंञीपद दिले तर ठाकरेंची कार्यकर्ते मोठी होऊ शकतात याशिवाय मागील वेळी पक्षाने त्यांना संधी दिल्याने यावेळी ते मंञीपदापासून दूर ठेवले जाऊ शकतात
नंबर दोनवर असलेला कन्नड विधानसभेत माजी केंद्रिय मंञी रावसाहेब दानवेंच्या कन्या आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव या शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत.
शिवाय संजना जाधव यांची पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने त्यांनाही मंञीपदापासून दूर रहाव लागू शकत.
फुलंब्रीत अनुराधा चव्हाण या भाजपकडून निवडून आल्या आहेत. परंतु त्यांचीही ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांनाही मंञीपदापासून दूर रहावे लागु शकते.
संभाजीनगर मध्यमध्ये प्रदिप जयस्वाल शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडून आले आहेत माञ चर्चेत मुद्दा नसल्याने मंञीपदाबाबत जर तर होऊ शकते.
संभाजीनगर पुर्वमध्ये अतुल सावे भाजपकडून निवडणूक जिंकले आहे. हिंदू मतांच्या पाठबळावर सावे नेहमीच निवडून येतात याशिवाय भाजपकडून सावे हा प्रसिद्ध प्रचलित चेहरा असल्याने त्यांना पुन्हा मंञीपद मिळू शकते.
संभाजीनगर पश्चिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेत निवडून आलेले संजय शिरसाठ हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांना मंञीपद दिले जाऊ शकते.
पैठणमधून विलास भुमरेंची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने त्यांनाही मंञीपदापासून दूर रहावे लागणार आहे
गंगापूर विधानसभेत प्रशांत बंब भाजपकडून चौथ्यांदा विजयी झाले आहेत त्यामुळे त्यांना यावेळी भाजपमध्ये मंञीपद दिले जाऊ शकते याची दाट शक्यता आहे.
वैजापूर विधानसभेत आमदार प्रा रमेश बोअरनारे यांनी किंतु परंतु न करता शिंदेंच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत शिंदे सांगतिल तीच पुर्वदिशा मानून शिंदेचे निकटवर्तीय ठरले आहे.याशिवाय एकनाथ शिंदे हे वैजापूरात प्रचारासाठी आले असता त्यांनी रमेश बोरनारे हा माझा लाडका आमदार असा उल्लेखही केला आहे.याशिवाय बोरनारे हे दुसऱ्यांदा विधानसभेवर गेल्याने त्यांना मंञीपद मिळू शकते अशी दाट शक्यता आहे.
एकंदरीत भाजपकडून अतुल सावे , प्रशांत बंब यांची नांवे मंञीपदासाठी समोर येऊ शकतात तर शिवसेना शिंदेकडून संजय सिरसाठ, प्रा आमदार रमेश बोरनारे यांना मंञीपद मिळू शकत.अशी दाट शक्यता आहे.