ताज्या बातम्या बिंदास राजकारण

बिंदास आखाडा -या मातब्बर पहिलवानांच्या कुस्तीने रंगणार लासूर गटाचा जंगी आखाडा | Bindass News

वैजापूर विधानसभेचा रणसंग्राम खुपच लक्षवेधी ठरला..एकंदरीत या रणसंग्रामात मोठ्या प्रमाणात टिका टीप्पण्याही झाल्या.परंतु आता ही निवडणूक संपत नाही तोच नगरपालिका आणि जिल्हा परीषदेसह पंचायत समिती निवडणूका होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
यातच वैजापूरचे कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्या दणदणीत विजयाने भल्या भल्या मात्तबरांची पाचावर धारण बसली आहे.
आता जिल्हा परीषद लढणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला बोरनारे यांच विकासाच चक्रव्यूह भेदण आव्हाणात्मक होणार आहे.

परंतु असे असले तरीही जिल्हा परीषद आणि विधानसभा यात फरक असल्याचे काही जण अगदी सहजच बोलून जातात.
यातच जिल्हा परीषद पंचायत समिती उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून भेटी गाठींचा वेग वाढविताना दिसत आहे.
अशातच संभाव्य उमेदवारांची चर्चा आपण या रिपोर्टमध्ये पहाणार आहोत

आजच्या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया लासूर विभागातील संभाव्य जिल्हा परीषद आणि पंचायत समिती उमेदवारांबद्दल

महीयुती ही निवडणूक एकञ लढवू शकते तर महाविकास आघाडीसुद्धा एकञ असेल असा अंदाज आहे.यातच मागील वेळी अगदी कानाजवळून गोळी गेली आणि थोडक्यात नेम हुकला म्हणून आजही चर्चेत आहेत ते म्हणजे सुभाष पाटील तांबे …

मा खासदारांच्या सुनबाई वैशालीताई पाटील यांना तांबे यांनी टफ फाईट देत लढत लक्षवेधी केली.अजून ही जागा कुठल्या प्रवर्गाला जाईल हे निश्चित नसले तरीही खुल्या प्रवर्गाची चर्चा दबा धरून बसलेली आहे.
यावेळी तांबे यांनी आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याने ते ही निवडणूक धनुष्यबाणावर लढू शकतात अशी दाट शक्यता आहे.
आमदारांचे निकटवर्तीय शिवाय मुलगा ईश्वर तांबे यांचा दांडगा जनसंपर्क यांमुळे जिल्हा परीषदेकरीता त्यांच्या हातात तीरकमान म्हणजेच धनुष्यबाण दिल्या जाऊ शकतो. हे गणित असच चर्चेत राहील तर त्यांच्या विरोधात यावेळी माञ ऊबाठाचे निष्ठावंत आणि अंबादास दानवेंचे प्रिय असलेले मा पंचायत समिती सभापती मनाजी पाटाल मिसाळ यांना महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.याशिवाय मिसाळ यांच्याकडे मागील एक पंचवार्षीक जिल्हा परीषद सदस्यपदाचा अनुभवही आहेत त्यामुळे मिसाळ यांना डावलून पक्ष धोका पत्करणार नाही हे माञ निश्चितच.असे असले तरी ऊबाठा मध्येही मनाजी पाटील यांचे पाय ओढणारांनी जर त्यांना साथ दिली तर ही निवडणूक रंगत आनेल यात शंका नाही.
याशिवाय या दोघांमध्ये आजही चर्चेत आहेत ते म्हणजे भाजपचे कल्याण पाटील दांगोडे यांना मागील दोन निवडणूकीत थोड्याफार फरकाने अपयश आल असल तरी जर योगायोगाने संधी भेटलीच तर कमळ घेऊन ते ही जिल्हा परीषदेच्या मैदानात उतरू शकतात.हे माञ नक्की परंतु पक्षाशी एकनिष्ठ असलेले दांगोडे यांना पक्षादेश आणि महायुतीचा समन्वय साधता आला तर माञ ही निवडणूक ऊत्सुकता आणि ऊत्साह वाढविणारी ठरेल यात शंका नाही.याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून जळगांवचे सरपंच संभाजी पाटील जगताप,शिवराईचे सरपंच राजेंद्र पाटील चव्हाण,कचरू अण्णा डीके यांची नावे समोर येऊ शकतात. दिगंबर वाघचौरे इच्छूक असल्याच समजत.या नावांच्या व्यतीरिक्त इतर हौशे नवसे अपक्ष उमेदवार ऐनवेळी जोर का झटका धीरे से देण्यासाठी गेमचेंजर ठरतील.

लासूर विभागातील दोन गणांबद्दल चर्चा करूया ..पालखेड आणि लासूर गणातील संभाव्य उमेदवार
सर्वप्रथम पालखेड गणाबाबत जाणून घ्यायचे झाल्यास पालखेड गणातून
महायुतीकडून संभाजी पाटील जगताप यांच्या नावाची चर्चा रंग धरून आहे.शिवाय मा पंचायत समिती सभापती राहीलेले पालखेड गांवचे भुमीपुञ यांचे अत्यंत विश्वासू असेलेले खुल्या प्रवर्गातून ग्रा पं सदस्य आणि विवीका सेवा संस्थेचे संचालक भानुदास जगदाळे यांना संधी मिळू शकते.कारण एकाच पंचवार्षिकमध्ये जगदाळे यांना बहु मताधिक्याने जनतेने निवडून दिले आहे.याशिवाय गावच्या राजकारणासह गणातील प्रत्येक गावात जगदाळे यांचा जनसंपर्क चांगला आहे.त्यातच जर बाळू पाटील शेळके यांनी श्रीकृष्णाची भुमिका घेतली तर या लढतीत जगदाळे अर्जून ठरतील यात शंकाच नाही.याशिवाय जर जागा ओबीसीकडे गेलीच तर विद्यमान सरपंच आशाताई रामहारी शेळके किंवा रामहारी शेळके यांना सुद्धा संधी
मिळण्याची दाट शक्यता आहे.रामहारी शेळकेंना संधी मिळाल्यास विरोधकसुद्धा त्यांना मदत करतील यात शंका नाही.याशिवाय नवनाथ शिंदे ,गणेश काळे, राजु चव्हाण यांची नांवे समोर येऊ शकतात.

महाविकास आघाडीकडून ऊबाठा यांच्या पक्षाकडून नंदकीशोर जाधव यावेळी तिकीट मिळवीण्याच्या शर्यतीत आहेत.मा खासदार चंद्रकांत खैरेंच्या विश्वासार्ह ठरलेले जाधव हे ऐनवेळी जिल्हा परीषदेकडेही हात घालू शकतात ही शक्यता नाकारता येणार नाही.,तसेच मा खासदार यांच्या परीवारातील कुण्या एक सदस्याचे नांव चर्चेतून समोर येऊ शकते.शिवाय सारंगधर डीके यांनाही परदेशींच्या मदतीन तिकीट दिल जाऊ शकत.

याशिवाय अनेक दिग्गज ऐनवेळी मैदानात उतरू शकतात.

लासूर विभागातील लासूर गणात
महाविकास आघाडीचे बहुचर्चीत चेहऱ्यांपैकी एक असलेला चेहरा म्हणजे विट्ठल पाटील डमाळे हे ही निवडणूक ठामपणे लढवतील असा कयास आहे.कारण धोंदलगांवच्या राजकारणात विट्ठलरावांनी एक वेगळाच जम बसविला आहे.सर्वात कमी वय असलेल्या त्यांच्या पत्नीला जनतेने भरपूर मते देत चर्चेत आनले होते.ऊबाठा त युवासेना जिल्हाप्रमुख पदावर विराजमान असलेले डमाळे यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत .त्यामुळे त्यांना या निवडणूकीत पक्ष डावलूच शकत नाही हे तितकेच सत्य आहे. आणि जर जागा ओबीसी प्रवर्गाकडे राहीलीच तर डमाळे यांचा प्लान बी त्यांना पंचायत समिती उमेदवार करेन हे माञ नक्की. याशिवाय लासूर गांवचे भुमिपुञ असलेले कीशोर पाटील हरीश्चंद्रे यांना आमदारांचा वरदहस्त मिळाला तर तिकीट मिळू शकते.लासूर गणात प्राबाल्य राखून असलेले रितेशशेठ मुनोत यांचीही निवडणूकीच्या आखाड्यात ऐनवेळी एंट्री होऊ शकते. शिवाय पप्पु हुमे हे ही वेळेवर तिकीटाची मागणी करू शकतात.

मिञांनो या रिपोर्टमध्ये मांडण्यात आलेली माहिती ही जनकल्पक कयासावर आधारीत असून बिंदास मिडीया या माहितीशी सहमत असेलच असे नाही.कारण राजकीय गणिते कुठल्याही क्षणाला बद्लू शकतात हे माढ तितकचं सत्य

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.