ताज्या बातम्या बिंदास राजकारण

वैजापुरात पहिल्याच दिवशी दहा उमेदवारी अर्ज दिले..अर्ज घेणारे दिग्गज यादी

निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने विनायकराव पाटील महाविद्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणूक नामनिर्देशन/उमेदवारी अर्ज देणे प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी (मंगळवारी) एकूण दहा अर्ज वाटप करण्यात आले.

” उमेदवार डॉ. दिनेशसिंग पद्मसिंह परदेशी व शिल्पा दिनेश परदेशी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून  / राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज  घेतला. नबी पटेल (तिडीकर) यांनी अपक्ष उमेदवारी लढविण्यासाठी अर्ज घेतला. ज्ञानेश्वर एकनाथ घोडके ,पालखेड यांनी वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारी करता अर्ज घेतले. बाबासाहेब बापूराव पगारे शिऊर यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी अर्ज घेतला”

. मंजाहरी धोंडीराम गाढे राहणार नांदगाव, डॉ. राजीव बबनराव डोंगरे राहणार वैजापूर, भागवत कुर्मदास निकम राहणार चिकटगाव, प्रशांत दादासाहेब सदाफळ राहणार वैजापूर यांनी अपक्ष उमेदवारी करता फॉर्म घेतला .

हे फॉर्म वाटप सकाळी ११ ते ३ या वेळेत विनायकराव पाटील महाविद्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात करण्यात आली यावेळेस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व अधिकारी कर्मचारी यांना स्वतंत्र प्रवेश पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. फॉर्म घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवार व हस्तक यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड व तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार सुरज कुमावत हे नामनिर्देशन प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.