
अवस्था खूपचं वाईट झालेली आहे. त्यामुळे सर्व चालू बाकीदार तसेच कर्जदार शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज सरसकट माफ करण्याची मागणी वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथील वि. वि. का. सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन डॉ. अर्जुन साळुंके यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
काही शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे झालेली कर्जमाफी बघता थकबाकीदार सभासदांनाही न्याय दिला आहे. परंतु चालू बाकीदार म्हणजेच नियमीत पीककर्ज
भरणाऱ्या सभासदांनाही तसा सरसकट कर्जमाफीचा प्रोत्साहनपर म्हणून अत्यल्प लाभ देण्यात आला होता. त्यामुळे चालू बाकीदार शेतकरी सभासदांमध्ये सरकारविषयी असंतोष निर्माण होतो.

तसेच शेतकऱ्यांची नियमीत कर्ज परतफेड करावयाची मानसिकता राहत नाही. ज्यामुळे वि. वि. का. सेवा संस्थेचे सभासद थकबाकीचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे जास्त खाते एनपीएमध्ये जातात. म्हणून एकुण कर्जदार सभासदांपैकी ९५ टक्के शेतकरी चालू बाकीत असलेले कर्जदार सभासदांची कर्जमाफी करावी अशी मागणीही डॉ. साळुंके यांनी केली आहे.