तीन मुलींवर अठरा मुलांकडून बलात्कार पीडिता आणि आरोपींसह सर्वजण अल्पवयीन
रांची : झारखंड
झारखंडमधील खूंटी जिल्हा सामूहिक बलात्काराच्या प्रकारामुळे हादरला असून, यातील आरोपी आणि पीडिता असे सर्वजण अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी हा घृणास्पद प्रकार उजेडात आला.
एक लग्न(marriege) समारंभ आटोपून पाच अल्पवयीन मुली घरी परतत असताना अठरा मुलांनी त्यांचे अपहरण केले. नंतर त्यापैकी तीन मुलींवर या अठरा अल्पवयीन मुलांनी आळीपाळीने (Rape)बलात्कार केला.

या मुलांच्या तावडीतून दोन मुलींनी स्वतःची सुटका करवून घेत गाव गाठले आणि गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली.
पोलिसांनी याप्रकरणातील सर्व आरोपी मुलांना ताब्यात घेतले आहे. ही मुले बारा ते सतरा या वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.
आरोपी मुलांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.