छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास Crime बिंदास महाराष्ट्र

Rape Case: भिक्षुकाला हकलून दिले ,तीचा विश्वास संपादीत केला आणि मग बसमध्येच तीच्यावर…

 In Pune’s Swargate area, a young woman was subjected to harassment at the hands of a monk. पुण्यातील स्वारगेट स्थानकात सराईताचा तरुणीवर अत्याचार

चौकशीसाठी भाऊ ताब्यात; बस स्थानकाच्या सुरक्षेचे वाभाडे

पुणे :

परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून सराईताने शिवशाही बसमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना येथील स्वारगेट एस.टी. स्थानकाच्या आवारात मंगळवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

तरुणीवर बलात्कार करून पसार झालेल्या सराईताचे नाव निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. याबाबत २६ वर्षीय पीडितेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिस तपासाचा अहवाल मागविला आहे.

या घटनेमुळे पुणे शहरासह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने स्वारगेट एस.टी. स्थानकात आंदोलन केले. यावेळी त्यांनी एस.टी. महामंडळाचे सुरक्षा रक्षक बसत असलेल्या केंद्राची तोडफोड करत महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी स्वारगेट बसस्थानक परिसरात भेट दिली. घटनेचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांकडून

। पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट

। मुख्यमंत्र्यांनी पोलिस तपासाचा अहवाल मागवला

| ठाकरे शिवसेनेकडून बसस्थानकात तोडफोड

 

आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल मागवून घेतला आहे.

आरोपीने गोड बोलून विश्वास संपादला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी पुण्यात वैद्यकीय सेवा क्षेत्रात काम करते. ती मूळची फलटण तालुक्यातील आहे. मंगळवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास गावी जाण्यासाठी स्वारगेट एस.टी. स्थानक परिसरात

 

ती आली होती. फलटणकडे जाणाऱ्या बस जेथे लागतात तेथे ती बसली होती. आरोपी गाडे तिच्याजवळ आला. त्याने शर्ट इन केले होते, तर तोंडाला मास्क लावला होता. तरुणीजवळ जात असताना, त्याने एका भिक्षेकऱ्याला हटकून तरुणीवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. त्याने तरुणीला कोठे जायचे? अशी विचारणा केली. तिने फलटणला जायचे .. सांगितले.

अधिकाऱ्यांची चौकशी; २३ सुरक्षा रक्षक निलंबित

या प्रकरणाची गंभीर दखल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. बसस्थानकावर कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहायक वाहतूक अधीक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश सरनाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

तसेच, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी गुरुवारी एस.टी.च्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची सूचना त्यांनी केली. सोबतच, स्वारगेट स्थानकावर ड्युटी बजावत असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांना तातडीने निलंबित करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले.

बस स्थानकाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रीकरणात आरोपी स्पष्टपणे दिसला आहे. त्याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांत जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीची पोलिसांनी ओळख पटवली असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ८ पथके तयार केली आहेत.

  • स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.