दोन वर्षांत कमी झाल्या ५०० शाळा; इंग्रजी शाळांत ६ लाख विद्यार्थी वाढले
मुंबई
इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणापुढे मराठी शाळांत शिकत असलेले विद्यार्थी कमी होऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत मराठी शाळांतील तब्बल तीन लाख विद्यार्थी कमी झाले आहेत, तर ५०० हून अधिक मराठी शाळा कमी झाल्या आहेत.
त्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या ३०० शाळा वाढल्या असून, तब्बल ६ लाख विद्यार्थी वाढले आहेत. इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणापुढे राज्यातील खासगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रस्थापित माय मराठी शाळांना उतरती कळा लागली आहे, हे धक्कादायक वास्तव आहे.

राज्यात खासगी अनुदानित, विनाअनुदानित, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अशा मिळून पहिली ते बारावीपर्यंत सर्व माध्यमाच्या तब्बल १ लाख ८ हजार शाळा आहेत. या
शाळांत सुमारे २ कोटी ११ लाख विद्यार्थी शिकत आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात ८६ हजार १५७शाळांमध्ये १ कोटी ३३ लाख १३ हजार ५०१ विद्यार्थी शिकत होते, तर १४ हजार ८१० इंग्रजी शाळांत ६० लाख ६२ हजार ७५० विद्यार्थी शिकत होते.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात २५९ शाळा कमी झाल्या आणि १ लाख ६८ हजार ६६४ विद्यार्थी कमी झाले आहेत, तर इंग्रजी शाळा १५ ने वाढल्या आहेत. मात्र, प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांत
२,५०० शाळा बंद पडण्याच्या स्थितीत
पालकांची इंग्रजी शाळांना पसंती आणि मराठी शाळांना निरोप, या भूमिकेमुळे राज्यातील अडीच हजारांहून अधिक मराठी शाळा अडचणीत आल्या आहेत. यामध्ये कोकण विभागात ५००, पश्चिम महाराष्ट्रात ७००, मराठवाड्यात ४००, उत्तर महाराष्ट्रात ३००, तर विदर्भात ८०० हून अधिक शाळांचा समावेश आहे. विशेषतः, ग्रामीण भागात मुलांची संख्या कमी झाली आहे, तर शहरी भागात इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा आहे, त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठी शाळांकडे विद्यार्थी फिरवत
असलेली पाठ हा चिंतेचा विषय बनला आहे. विदर्भात जवळपास ९८६ शाळा या एक आकडी पटसंख्येच्या झाल्या आहेत. १० पेक्षा कमी पटसंख्या झाल्याने या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोकणात ही संख्या ७०० च्या घरात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या प्रत्येक जिल्ह्यात सरासरी १५० ते २०० शाळा बंद पडण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एका बाजूला राज्यातील अडीच हजार शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. दुसऱ्या बाजूला मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढावी म्हणून सीबीएसईच्या धर्तीवर पहिलीपासून मराठी भाषा विषयाचा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय!